मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या महाराष्ट्रातील वाटचालीवर कोणताही परिणाम होणार नाही. आतापर्यंत मान्सून कारवारपर्यंत दाखल झाला आहे. २-३ दिवसांत मान्सून तळकोकणाकडे सक्रिय होईल. तसेच आगामी महिन्यांत मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. याशिवाय, रायगड, ठाणे आणि नाशिकमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल, असे मुंबई हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
निसर्ग चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून आज सकाळपासून मुंबापुरीला पावसाने झोपडले. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. दिवस ओसरल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली आहे. पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील दिवसात मुंबईतील पावसाचे स्वरुप असे नसेल. मात्र, ढगाळ वातावरण असेल, अशी माहिती मुंबई हवामान विभागाने दिली आहे.
आज सर्वाधिक पाऊस मुंबईतील वडाळा भागात पडला तिथे 67.04 मिमी नोंद झाली. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सांताक्रुझ येथे 42.0 मिमी तर कुलाबा येथे 49.4 मिमी नोंद झाली आहे. उद्या शहर व उपगरात आकाश हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात कमालीची घट झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान गोंदिया येथे 35.4 अंश नोंदविले गेले आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात असलेले तीव्र चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबात झाले आहे. ते आता उत्तर पश्चिम, विदर्भ व लगतच्या मध्यप्रदेशावर आहे.
पावसाची नोंद -
वडाळा - 67. 04 मिमी
चेंबूर - 50. 3 मिमी
वांद्रे- 46.99 मिमी
देवनार - 40. 63 मिमी
दादर - 44.96 मि
मी