मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा देणारी बातमी आहे. कंबोजविरोधात असलेले सर्व गुन्हे सीबीआयकडून रद्द करण्यात आले आहेत. कंबोज यांच्याविरोधात इंडियन ओव्हरसीज बँकेच्या व्यवस्थापनाने फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे बँक ऑफ बडोदाने देखील त्यांना कर्ज बुडवे घोषित करण्याची तयारी केली होती. विविध प्रकरणात त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप देखील करण्यात आले होते. परंतु यासर्व आरोपांमधून त्यांना क्लीन चीट मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोहित कंबोज यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ज्यामधून त्यांना सीबीआयकडून क्लिन चीट मिळाली आहे.
कोणताच गुन्हा नाही : मोहित कंबोज भारतीय हे नेहमीच त्यांच्या ट्विटरवरील ट्विटमुळे चर्चेत असतात. विरोधकांवर आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आर्थिक व्यवहारावरुन कंबोज यांच्यावर विविध गुन्हे दाखल होते. परंतु हे सर्व गुन्हे सीबीआयने रद्द केले आहेत. यामुळे ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मोहित कंबोज यांच्यावर आता कोणताही खटला नसल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात CBI ने सादर केला आहे. कंबोज यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या संबंधित बॅँकेनेही नो ऑबजेक्शन अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मोहित कंबोज यांच्यावर आता कोणतीही केस नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कंबोज यांचे सूचक ट्विट : भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून मोहित कंबोज यांना ओळखले जाते. खासदार संजय राऊत यांच्यावर केलेले आरोपांमुळे मोहित कंबोज हे नेहमीच चर्चेत आले होते. तसेच त्यांच्याकडे असलेली संपत्ती यामुळे देखील त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. मात्र आता कंबोज यांना सीबीआयने अखेर क्लिन चिट दिली आहे. यानंतर मोहित कंबोज यांनी 'सत्यमेव जयते' हर हर महादेव असे सूचक ट्विट केले आहे.
हेही वाचा -