ETV Bharat / state

बालभारतीच्या खुलाशानंतर कुर्बान हुसेन यांच्या नावाच्या आक्षेपावरील विरोध मावळला - ब्राम्हण महासंघ

भगतसिंग, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या ठिकाणी सुखदेव असा उल्लेख असायला हवा होता, परंतु त्या ठिकाणी कुर्बान हुसेन यांचे नाव आल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप घेतले होते. मात्र, हे पुस्तक राज्यात भाजपचे सरकार असताना आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याच काळात तयार झाले असल्याने सायंकाळपर्यंत भाजप आणि ब्राह्मण महासंघ आणि शिक्षकांकडून घेण्यात आलेला आक्षेप मावळल्याचे दिसून आले.

clarification-by-balbharati
बालभारती
author img

By

Published : Jul 18, 2020, 6:51 AM IST

मुंबई - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करले हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पण बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात सुखेदव यांच्या जागी कुर्बान हुसेन फासावर गेले, असा उल्लेख करण्यात आला आहे. तो उल्लेख मूळ लेखकांच्या पुस्तकात तसाच असून त्यात हुसेन यांचेही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान होते, असा खुलासा बालभारतीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपप्रणित शिक्षक संघटनांसोबत ब्राह्मण महासंघानेही घेतलेला विरोध सायंकाळपर्यंत मावळल्याचे दिसून आले.

clarification-by-balbharat
बालभारती

बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतलेल्या ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ असा धडा आहे. या धड्यातील व्यक्ती शाळकरी मुलांनी देशप्रेमाबद्दल समजावून सांगत आहे. यावेळी त्यांच्यातील संवाद धड्यात देण्यात आला असून एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नात “भगतसिंग, राजगुरु, कुर्बान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते” असे वाक्य आहे. या वाक्यावर ब्राह्मण महासंघ आणि काही भाजपप्रणित शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी आक्षेप घेतले होते. त्यावर बालभारतीने खुलासा करत हुसेन यांचेही स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान असल्याचे म्हटले आहे.

पुस्तक भाजप सरकारच्या काळातलेच-

बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात ज्येष्ठ साहित्यिक यदुनाथ थत्ते यांच्या प्रतिज्ञा या पुस्तकातील माझ्या देशावर माझे प्रेम आहे, प्रकरण असून त्यात भगतसिंग, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या ठिकाणी सुखदेव असा उल्लेख असायला हवा होता, परंतु त्या ठिकाणी कुर्बान हुसेन यांचे नाव आल्याने त्यावर अनेकांनी आक्षेप घेतले होते. मात्र हे पुस्तक राज्यात भाजपाचे सरकार असताना आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याच काळात तयार झाले असल्याने सायंकाळपर्यंत भाजप आणि ब्राह्मण महासंघ आणि शिक्षकांकडून घेण्यात आलेला आक्षेप मावळल्याचे दिसून आले.

कोण होते कुर्बान हुसेन?

देशात १९३१ मध्ये ज्यावेळी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी देशासाठी हौतात्म्य स्वीकारले, त्याच वेळी म्हणजे अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांनाही इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून फासावर चढवले होते. १२ जानेवारी १९३१ रोजी त्यांना वयाच्या २२ व्या वर्षी फाशी देण्यात आली. अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत. अब्दुल कुर्बान हुसेन यांच्यासोबत सोलापूरचे मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे तरुणदेखील फासावर चढले. हा दिवस सोलापूरकर हुतात्मा दिन म्हणून पाळतात. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. परंतु शिक्षकांनाच हे माहीत नसल्याने आज दिवसभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.