ETV Bharat / state

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी मिळणार ओळखपत्र - पालिका आयुक्त

author img

By

Published : Aug 9, 2021, 8:11 PM IST

Updated : Aug 9, 2021, 8:44 PM IST

राज्य सरकारने ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना लोकल प्रवासामध्ये सूट दिली आहे. राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून अशा नागरिकांना त्यासाठी ऍपच्या माध्यमातून ऑनलाइन ओळखपत्र दिले जातील.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई - राज्य सरकारने ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना लोकल प्रवासामध्ये सूट दिली आहे. राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून अशा नागरिकांना त्यासाठी ऍपच्या माध्यमातून ऑनलाइन ओळखपत्र दिले जातील. तसेच ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांना ऑफलाइन पद्धतीने ओळखपत्र दिली जातील, अशी माहिती पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. या कालावधीत लसीचे दोन डोस असलेल्या नागरिकांचा मुभा दिली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले.

बोलताना पालिका आयुक्त

ऍपच्या माध्यमातून ओळखपत्र

मुंबईसह एमएमआर रिजनमधील सामान्य नागरिकांना लोकल रेल्वेतून प्रवास करता यावा यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी केली जात होती. याबाबत उच्च न्यायालयानेही राज्य सरकारची कान उघडणी केली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासामध्ये मुभा देण्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यानंतर 14 दिवसात अँटीबॉडीज तयार होतात. ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झाले आहेत अशा नागरिकांनाच रेल्वे प्रवासामध्ये मुभा देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका आणि सरकारकडून ऑनलाइन ऍपच्या माध्यमातून ओळखपत्र दिले जाईल. त्यासाठी येत्या दोन दिवसात पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ऍप विकसित केले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. ज्या नागरिकांकडे स्मार्ट फोन नाहीत अशा नागरिकांना ऑफलाइन ओळखपत्र दिले जाईल. त्यासाठी पालिका कार्यलयातून नागरिकांना सहकार्य केले जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

नोव्हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होईल

मुंबईमध्ये एकूण 76 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामधील 56 लाख नागरिकांना पहिला तर 19 लाख नागरिकांना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. मुंबईमधील 19 लाख आणि बाजूच्या शहरातील आणि जिल्ह्यातील 15 लाख, अशा एकूण 30 लाख नागरिकांना प्रवासाची मुभा मिळणार आहे. मुंबईत 90 लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यासाठी एकूण 1 कोटी 80 लसीचे डोस लागणार आहेत. मुंबईमधील एकूण 61 टक्के नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. खासगी कॉर्पोरेट संस्थांच्या सीएसआर फंडाचा वापर करून मोफत लसीकरण केले जात आहे. यामुळे येत्या नोव्हेंबरपर्यंत मुंबईकरांना लसीचे डोस दिले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.

लसीकरण नसल्यास प्रवास नाही

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. अशीच मुभा ज्या ठिकाणी निर्बंध शिथिल केले जातील त्याठिकाणी दिली जाणारा आहे. पुढे येणाऱ्या दिवसामध्ये मॉल, जिममध्ये आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार पूर्ण थांबण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो, या आकालावधीत लसीचे दोन डोस असलेल्या नागरिकांचा मुभा दिली जाणार आहे यामुळे मुंबईकरांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले.

दीड वर्षात लोकलचे दार सुरू-बंद

गेल्या वर्षी संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला होता. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी देशात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे 22 मार्च, 2020 पासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या आग्रहानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठी 15 जून, 2020 पासून मर्यादित लोकल सेवा सुरू केली होती. त्यानंतर अनलॉकची सुरुवात होताच कर्मचार्‍याची संख्या वाढल्याने लोकल फेर्‍या वाढविण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर नवरात्रीमध्ये 17 ऑक्टोबर, 2020 पासून मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर पुरुष प्रवाशांनाही लोकल प्रवासांची परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना वेळेची मर्यादीत घालून लोकल प्रवासांची परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे 22 एप्रिल, 2021 पासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुन्हा एकदा लोकल प्रवासावर बंदी घातली होती. फक्त अत्यावश्यक आणि वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांना लोकल प्रवासाची परवानगी होती.

हेही वाचा - अधिकार नसलेल्या मंत्र्यांना गंभीर घेऊ नये, नवाब मलिकांची रावसाहेब दानवेंवर सडकून टीका

Last Updated : Aug 9, 2021, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.