मुंबई : मुंबईत एकामागून एक संतापजनक गुन्हे घडत असून ते थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. एका ४२ वर्षीय महिलेवर तिच्या घरात घुसून तीन जणांनी सामूहिक बलात्कार (Gang rape case with woman) केल्याची खळबळजनक ( Gang Rape Case) घटना कुर्ला (Kurla Gang rape case) येथे घडली आहे. पीडितेवर धारदार शस्त्राने वार केले (stabbing victim with sharp weapon) आणि सिगारेटने तिच्या गुप्तांगास चटके (Cigarette burns on womans private parts) दिल्याचे वैद्यकीय तपासात (latest news from Mumba) उघडकीस आल्याचे पोलीस सुत्रांच्या (Mumbai crime) अधिकाऱ्याने सांगितले.
महिलेच्या छातीवर धारदार शस्त्राने वार : ही घटना बुधवारी पहाटे कुर्ला येथे घडली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. आरोपी आणि पीडित महिला एकाच ठिकाणी राहतात. पीडितेवर आरोपींनी एकामागून एक आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी तिच्यावर एकामागून एक बलात्कार तर केलाच शिवाय तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार देखील केला. त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवर सिगारेटचे चटके दिले. त्याचप्रमाणे तिच्या छातीवर आणि दोन्ही हातांवर धारदार शस्त्राने वार केले. एका आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तिला पोलीस ठाण्यात गेल्यास तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी पुढे माहिती पोलिसांनी दिली.
एनजीओसी संपर्क साधल्यावर पोलीस सतर्क : कुर्ला पोलिस ठाण्यात याबाबत तीन आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ३७६डी (सामूहिक बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध), ३२४ (शस्त्राने दुखापत करणे) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने तिचा त्रास शेजाऱ्यांना सांगितला. त्यांनी एका एनजीओशी संपर्क साधला आणि मग आमच्या पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवला गेला. आरोपी सध्या फरार असून कुर्ला पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गुन्ह्यांमध्ये १३.२% वाढ झाली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या 'क्राइम इन इंडिया 2021' अहवालानुसार, भारतात 2021 मध्ये बलात्काराच्या 31,677 घटनांची नोंद झाली. दररोज सरासरी 86 प्रकरणे तर दर तासाला महिलांवरील गुन्ह्यांची 49 प्रकरणे नोंदवली गेली. आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत २०२१ मध्ये महिलांवरील एकूण गुन्ह्यांमध्ये १३.२% वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग, अॅसिड हल्ला, पती/त्याच्या नातेवाईकांकडून क्रूरता आणि घरगुती हिंसाचार अशा प्रकारे महिलांवरील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.