मुंबई - लक्ष्मीपूजनानिमित्त मुंबईतील दादर स्वामीनारायण मंदिरात लक्ष्मीची म्हणजेच व्यवहारातील चोपड्यांची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी स्वामीनारायण मंदिरातील वरिष्ठ पुजारी, मुंबईतील नामांकित व्यापारी यांच्यासह भाविकांनी आपल्या व्यवहारातील चोपड्या तसेच पैशाची पूजा केली.
हेही वाचा - चेंबूरच्या गुडविन ज्वेलर्सच्या शाखेला ऐन दिवाळीत कुलूप; गुंतवणूकदार हवालदील
लक्ष्मीपूजन हा दिवस लक्ष्मीची पूजा करण्याचा असतो. पैशाला देवाचे स्थान दिल्याने त्याचा वापर पवित्रपणे करावा, पैसा मिळवताना तो चांगल्या मार्गानेच मिळवावा आणि तो खर्च करतानाही चांगल्या बाबींसाठीच खर्च करावा, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी म्हणून लक्ष्मीपूजन करण्याची ही परंपरा आहे. दिवाळीत घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. तर व्यापारी लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या आपल्या हिशेबाच्या वह्यांची म्हणजेच चोपडीची पूजा करतात. दादरच्या स्वामीनारायण मंदिरातही परंपरेनुसार अशा चोपड्यांची पूजा आज करण्यात आली.