ETV Bharat / state

Parenting Tips : पाठ करूनही मुलांच्या लक्षात राहत नाही, पालकांनी अवलंबल्या पाहिजेत या टिप्स

author img

By

Published : Oct 31, 2022, 2:20 PM IST

प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना वाचन आणि लेखनात सक्षम बनवायचे ( Parenting Tips )असते. उज्ज्वल भविष्यासाठी पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देतात. शिक्षक शाळेत शिकवतात. पालकही आपल्या मुलाची उजळणी घरी करून घेतात. मात्र अनेक वेळा उत्त्तरे पाठ करूनही मुले ते विसरतात. त्यावर आम्ही सांगितलेल्या गोष्टी करून पाहा.

Parenting Tips
पाठ करूनही मुलांच्या लक्षात राहत नाही

मुंबई : पालक आपल्या पाल्याला संपूर्ण अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न ( Parenting Tips) करतात. मात्र, परीक्षेच्या वेळी मुले खूप चांगले शिकवलेले धडे विसरतात आणि पेपरमध्ये अनेक प्रश्न सोडतात. त्याचा परीक्षेतील गुणांवरही परिणाम होतो. तुमचे मूल शिकवल्यानंतर लगेचच अभ्यासक्रम किंवा अध्याय विसरले तर त्याच्यावर रागावू नका, तर या पद्धतींनी मुलाला विसरण्याची समस्या सोडवा.

रट्टा मारू देऊ नका : शिकवताना लक्षात ठेवा की मुलाला त्या विषयाबद्दल समजावून सांगितले पाहिजे. बर्‍याचदा मुलांना विषय समजत नाही तेव्हा ते लक्षात ठेवण्यासाठी रट्टा मारतात. रट्टा मारून, मुल चांगले गुण मिळवू ( Do not let children ratta) शकतो. परंतू त्याच्या ज्ञानाचा विस्तार होत नाही. तसेच, जर मुल लक्षात ठेवलेला मजकूर विसरला तर तो परीक्षेत त्या विषयावर एक ओळ देखील लिहू शकणार नाही.

मुलांना उदाहरणांतून शिकवा : विषय लक्षात ठेवण्यासाठी शिकवताना, तो विषय मुलाच्या जीवनाशी निगडीत असल्याचे ( Teach children by example ) सांगा. जेव्हा मूल त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील गोष्टी समजते. तेव्हा त्याला धडा आठवतो. जसे की, मुले अनेकदा इतिहासाच्या विषयात तारखा विसरतात. पण जर आपण त्याच्या वाढदिवसाच्या तारखेशी संबंधित इतिहास शिकवला तर त्याच्या तारखा लक्षात राहतील.

गाण्यासारखी आठवण करा : मुलांना चित्रपटातील एखादे गाणे पूर्णपणे आठवते. पण धडा आठवताना ते ( Remember it like a song )विसरतात, असे दिसून येते. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना एखाद्या गोष्टीची आठवण करून द्याल तेव्हा त्यांना कविता किंवा गाणे गाऊन शिकवा. जेव्हा मुले विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी इत्यादी विषयांवर ओळींच्या स्वरूपात गाणे ऐकतात आणि गुणगुणतात तेव्हा त्यांना धडा लक्षात ठेवणे सोपे होते.

उजळणी आवश्यक : मुलाला एक धडा शिकवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पुढचा धडा शिकवायला सुरुवात करता. पण शिकवलेल्या अध्यायांची उजळणी देखील आवश्यक ( Revision required ) आहे. एखादा विषय पुन्हा पुन्हा लिहून आठवला तर तो पूर्णपणे मनात स्थिरावतो. म्हणून, प्रत्येक नवीन अध्याय सुरू करण्यापूर्वी, जुन्या धड्यांची उजळणी आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.