ETV Bharat / state

तीन वर्षाच्या बाळाचं तरुणीनं केलं अपहरण; मुंबई पोलिसांनी ठोकल्या तिकडीला बेड्या - सानिका वाघमारे

Child Kidnapped In Mumbai : शिवडीतून तीन वर्षाच्या बाळाचं अपहरण केल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुंबईतील तरुणीसह तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Child Kidnapped In Mumbai
अटक करण्यात आलेले आरोपी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 2:07 PM IST

मुंबई Child Kidnapped In Mumbai : दोन लाखाच्या आमीषाला बळी पडून तरुणीनं तीन वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण केल्यानं खळबळ उडाली. ही घटना शिवडी कोळीवाड्यात सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका तरुणीसह तिघांना बाळाच्या अपहरणप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. सानिका वाघमारे असं बाळाचं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर पवन पोखरकर उर्फ पव्या आणि सार्थक राजेंद्र बोंबले यांना वडाळा पोलिसांनी अटक केली आहे.

तीन वर्षाच्या बाळाचं अपहरण : शिवडी कोळीवाडा इथं राहणाऱ्या तक्रारदार सुमन कमलेश चौरसिया मंगळवारी वडाळा पोलीस ठाण्यात त्यांचा 3 वर्षीय मुलगा सापडत नसल्याची तक्रार घेऊन आल्या होत्या. दुपारी 12:30 ते 2:30 वाजताच्या सुमन कमलेश चौरसिया यांचा 3 वर्षीय मुलगा घरासमोरील मोकळ्या मैदानात खेळताना अचानक गायब झाल्याची तक्रार दिली. वडाळा पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. 3 वर्षीय बालकाची सुखरूप सुटका केली. महिला आरोपी सानिका वाघमारे आणि पवन पोखरकर उर्फ पव्या, सार्थक राजेंद्र बोंबले यांना वडाळा पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली आहे.

दोन लाखांसाठी केलं बाळाचं अपहरण : आरोपी सानिका वाघमारे हिनं आरोपी पवन पोखरकर उर्फ पव्या ( वय 20 वर्षे ) याच्या सांगण्यावरून सुमन चौरसिया यांच्या बाळाचं अपहरण केलं होतं. 2 लाख रूपयास विक्री करण्याच्या उद्देशानं संगणमत करून सानिका वाघमारे आणि पवन पोखरकर उर्फ पव्याच्या विरोधात वडाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 363, 370, 511, 34 सह कलम 84, 87 जे. जे. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं 2 पथकं तयार करून दाखल गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तत्काळ तक्रारदार रहात असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. यावेळी त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगी एका लहान मुलाला सोबत घेऊन जात असताना दिसली.

ओळखीच्या तरुणांनी आणलं बाळाला पोलीस ठाण्यात : अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत होते. यावेळी शकील बशीर शेख ( वय 19 वर्ष ) आणि साईनाथ शिवाजी कांबळे ( वय 24 वर्ष ) यांनी हरवलेल्या मुलास वडाळा पोलीस ठाण्यात आणून जमा केलं. या दोन्ही तरुणाकडं अधिक चौकशी केली असता, त्यांनी "बाळाला वडाळा ब्रिजवरून जात असताना त्यांच्या ओळखीची मुलगी सानिका ही वडाळा ब्रिज बस स्टॉपच्या बाजूला असलेली शिडी चढून वडाळा ब्रिजवर आली. त्यावेळी तिच्यासोबत हे बाळ होतं. त्यावेळी सानिकानं त्यांना सांगितले की, "तिच्याकडं असलेलं मूल हे तिला सापडलेलं असून ते त्यांना वडाळा पोलीस ठाणे इथं जमा करण्याचं आहे" असं सांगितलं. त्यामुळे त्या दोघांनी बाळाला पोलीस ठाण्यात आणून जमा केलं.

असं फुटलं बाळाच्या अपहरणाचं बिंग : सानिका वाघमारे हिला पोलिसांनी मोबाईलवर संपर्क साधून पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. बाळाबाबत अधिक चौकशी केली असता तिनं सांगितले की, "तिच्या ओळखीचा पवन पोखरकर उर्फ पव्या यानं 2 लाख रुपयासाठी 10 वर्षापर्यंतचा मुलगा आणण्यास सांगितलं होतं. तो 2 लाख रूपये देणार होता" असं सांगितलं. त्यामुळे ती त्या मुलाची विक्री करण्याच्या हेतूनं त्याला घेऊन तिचा मित्र पवन पोखरकर याच्यासह टॅक्सीनं कल्याण इथं गेल्याचं सांगितलं. तिचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानं आरोपी सानिका वाघमारे हिला न्यायालयाच्या परवानगीनं दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात मंगळवारी दुपारी 3:30 वाजता अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात सानिका सोबत पवन पोखरकर उर्फ पव्या आणि सार्थक राजेंद्र बोंबले यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानं त्यांना सकाळी 8:10 वाजता या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली.

हेही वाचा :

  1. Kidnapped Kids For Extortion : सासूच्या पैशावर जावयाची नजर; संपत्ती उकळण्यासाठी केला 'हा' मास्टर प्लॅन
  2. Mumbai Children Trafficking : पदपथावर झोपलेल्या मुलीचं अपहरण; पोलिसांनी आवळल्या सहा तस्करांच्या मुसक्या, न्यायालयानं सुनावली कोठडी
  3. नागपुरातून अपहरण झालेल्या मुलाची मध्य प्रदेशमधून सुटका, मजूर जोडप्याला अटक होऊनही अपहरणाचे कारण गुलदस्त्यात!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.