ETV Bharat / state

Lokmanya Tilak Terminus : लोकमान्य टिळक टर्मिनस! पुणे मुंबई ट्रेनवरील दगडफेकीत बालक जखमी - पुणे मुंबई ट्रेनवरील दगडफेकीत बालक जखमी

मोठी हानी झाली असती ती मात्र, वेळीच उपपचार मिळाल्याने ती झाली नाही. चेन्नई सेंट्रल -लोकमान्य टिळक टर्मिनस या ट्रेनमधील आनंद नावाच्या प्रवाशाने रेल मदद (क्र. 139)मार्फत माहिती दिली की, ट्रेनच्या बाहेरून दगडफेकीत एक मुलगा जखमी झाला आहे. (Lokmanya Tilak Terminus) त्यांनी तातडीने रेल्वेला कळवल्यामुळे त्या जखमी मुलाला वेळीच उपचार मिळाला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस
पुणे मुंबई ट्रेनवरील दगडफेकीत बालक जखमी
author img

By

Published : Jan 10, 2023, 9:41 PM IST

मुंबई : बालाजी हा १३ वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत प्रवास करत होता. पुण्यावरून मुंबईला ही ट्रेन निघाली होती . ट्रेनमध्ये ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणची खिडकी आणि दरवाजा हा उघडा होता . ट्रेनने पुणे स्टेशन सोडल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी बाहेरून दगड फेकण्यात आल्यामुळे बालाजीच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. दगडफेक करणाऱ्यांनी इतक्या वेगाने दगडफेक केला की दगड लागल पर्यंत त्या बालकाला कळले नाही की दगड फेकता आहेत आणि आपण स्वतःला वाचवले पाहिजे.

बालकाच्या संदर्भात माहिती : रेल्वे मदत केंद्राला 149 क्रमांकावरनं तातडीने याबाबत सूचना मिळाल्यानंतर त्यांनी कार्यवाही सुरू केली.तक्रार मिळाल्यानंतर रेल्वेने तातडीने लोणावळा येथे जखमीवर प्राथमिक उपचार केले आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे वैद्यकीय पथकानेही जखमीवर उपचार केले. जखमी बालकावर डॉक्टरांनी त्वरित योग्य ते उपचार केल्यामुळे त्याचा जीव बचावला. मात्र रेल्वे मधील आज एका प्रवाशाने रेल्वेला संपर्क करून या बालकाच्या संदर्भात माहिती दिल्यामुळे हे शक्य झाले.

कायद्याच्या तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई : शिवाजीनगर येथील आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी ज्या भागात पुण्यावरून ट्रेन मुंबईकडे निघाली होती त्या ठिकाणी दोन ते तीन किलोमीटरच्या परिसरात रेल्वे पोलीस दलाच्या जवानांनी कसून तपासणी केली. पाच तासांत गुन्हेगाराचा माग काढला. दुर्दैवाने या घटनेतील गुन्हेगार स्वतः अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्याने परिणामांची जाणीव नसताना फक्त गंमत म्हणून दगडफेक केली. अटक करण्यात आलेल्या अल्पवयीनावर रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

निश्चित जखमी झालेल्या व्यक्तींचा जीव वाचू शकतो : तक्रारदार प्रवासी आणि रेल्वेच्या या तत्पर कार्यवाहीमुळे समाधानी असून त्याने मदतीसाठी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले आहेत. याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जखमी झाल्यावर त्वरित उपचार मिळाला आणि रेल्वे प्रवाशांनी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे जर वागणूक केली तर निश्चित जखमी झालेल्या व्यक्तींचा जीव वाचू शकतो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.