ETV Bharat / state

गुन्हेगारांवर वचक, जनतेत आदरयुक्त भीती राहील असे वातावरण निर्माण करा - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे ई-उद्घाटन झाले. आयुक्तालयात ५ पोलीस उपायुक्त असणार आहेत. या वेळी बोलताना 'सर्वसामान्य निर्दोष जनतेला पोलिसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत असे वातावरण पोलिसांनी तयार करून जनतेला दिलासा मिळवून द्यावा. तसेच, पोलिसांचा वचक निर्माण करा,' असो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यूज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यूज
author img

By

Published : Oct 1, 2020, 5:14 PM IST

मुंबई - सर्वसामान्य निर्दोष जनतेला पोलिसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत असे वातावरण पोलिसांनी तयार करून जनतेला दिलासा मिळवून द्यावा. तसेच, पोलिसांचा वचक निर्माण करा. सागरी सुरक्षेबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून आदर्श, सुरक्षित व गतिमान अशी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाची ओळख निर्माण करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे ई-उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना 'बरेच दिवसापासून आयुक्तालयाची मागणी होती. शहरांच्या कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक बाब होती. या शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. येथील स्थानिक जनतेच्या मनात पोलिसांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण करतानाच पोलिसांबद्दलचा आदर निर्माण करा. वाईट कृत्य करतांना पोलिसांचे आपल्यावर लक्ष ठेऊन आहेत, ही भीती प्रत्येकाला वाटली पाहिजे. जनतेचे रक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. गुंडागर्दीला आळा घालण्याबरोबरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करा. आपल्या कर्तव्यकठोर कामगिरीने आदर्श आयुक्तालय म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे,' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पोलिसांचे आरोग्यही महत्त्वाचे -

केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर, एक माणूस म्हणून पोलिसांकडे बघितले जावे. कोरोना काळात त्यांच्या आरोग्याची तसेच कुटुंबीयांची काळजी घेण्यात यावी, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पोलीस आयुक्त सदानंद म्हणून दातेंसारखा सक्षम व जिगरबाज अधिकारी देण्यात आला आहे. ते निश्चितच आदर्श कार्य करतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, की कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे पोलीस आयुक्तालय आवश्यक होते. येथे नेमणूक देताना स्थानिक कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे. यामुळे त्यांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण होईल. मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांशी समन्वय ठेवून काम करावे लागणार आहे. तसेच सागरी सुरक्षेला गांभीर्याने घेऊन काम करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. या आयुक्तालयासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा - भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन; नागरिकांच्या गैरसमजुती दूर करणार वनविभाग

कोरोना काळात पोलीस अधिकाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेण्याबाबत त्यांनी गृहमंत्र्यांना सूचना केली. सामाजिक बांधिलकी म्हणून पोलिसांनी खूप चांगले काम केले आहे. या सर्व बांधवांचा राज्याला अभिमान आहे. पोलीस बांधवाच्या कुटुंबीयांचे योगदान अमूल्य आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्तालयाचा उपयोग होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

'कायदा व सुव्यवस्था तसेच सागरी सुरक्षेच्या दृष्टीने हे आयुक्तालय महत्त्वाचे आहे. आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तालय निश्चित चांगली कामगिरी करण्यात येईल. पुरेसा निधी साधनसामुग्री, मनुष्यबळ, लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल. अतिशय सक्षमपणे आयुक्तालयाचे कामकाज सुरू केले जाईल,' अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या आयुक्तालयाची मदत होईल, असा विश्वास पालघरचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर सागरी सुरक्षेला प्राधान्य पुढील कामाची दिशा ठरवावी लागणार आहे. आगामी काळात आयुक्तालय सक्षम करण्यावर निश्चित भर देण्यात येईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी प्रास्तविक केले. आभार प्रदर्शन करताना पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी आयुक्तालय गतिमान संवेदनशील कर्तव्यनिष्ठ पध्दतीने काम करेल, अशी ग्वाही दिली.

पोलीस आयुक्तालयाविषयी -

पोलीस आयुक्तालयात मीरा-भाईंदरमधील ६ आणि वसई- विरार मधील ७ अशी एकूण १३ पोलीस ठाणी आहेत. याशिवाय मीरा-भाईंदरमध्ये खारीगाव आणि काशिगाव अशी २ तर वसई- विरारमध्ये पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळिंज व नायगाव अशी ५ नवीन पोलीस ठाणी होणार आहेत. आयुक्तालयात ५ पोलीस उपायुक्त असणार आहेत. तर मीरा-भाईंदरमध्ये १ व वसई-विरारमध्ये २ झोन केले जाणार आहेत.

हेही वाचा - कोरोना काळात अतिक्रमणांवर 31 ऑक्‍टोबरपर्यंत तातडीने कारवाई करू नये-मुंबई उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.