ETV Bharat / state

खुशखबर! लवकरच ठाण्यातही रंगणार IPL चा थरार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

author img

By

Published : Nov 10, 2022, 11:42 AM IST

ठाण्यातील क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ठाण्याच्या भूमीवर IPL क्रिकेट सामने रंगणार ( IPL matches will be play in Thane ) आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूतोवाच केले आहे. त्यामुळे ठाणेकरांना IPL च्या आगामी सिझनचा थरार अनुभवायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातल्या पहिल्यावहिल्या फाईव्ह स्टार हॉटेलचे उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत ( CM Inaugurat Planet Bollywood Hotel ) होते.

CM
मुख्यमंत्री

नवी मुंबई : ठाण्यातील क्रिकेट रसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ठाण्याच्या भूमीवर IPL क्रिकेट सामने रंगणार ( IPL matches will be play in Thane ) आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूतोवाच केले आहे. त्यामुळे ठाणेकरांना IPL च्या आगामी सिझनचा थरार अनुभवायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यातल्या पहिल्यावहिल्या फाईव्ह स्टार हॉटेलचे उदघाटन झाले त्यावेळी ते बोलत ( CM Inaugurat Planet Bollywood Hotel ) होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पहिले फाईव्ह स्टार हॉटेल : आयपीएलचे खेळाडू नेहमीच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सरावासाठी ( IPL Practice ) येतात मात्र राहण्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेलची सुविधा नसल्यामुळे ते मुंबईला परत जात होते. आता ठाण्यात पहिले फाईव्ह स्टार हॉटेल 'प्लॅनेट बॉलिवूड' तयार झाले ( IPL Practice Dadoji Konddev Stadium ) आहे. आता आयपीएलचे खेळाडू ठाण्यात सराव करतील आणि या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन : रविवारी रात्री ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटमधील बायरजवळ ठाण्यातले पहिले फाईव्ह स्टार हॉटेल "प्लॅनेट बॉलिवूड" चे उदघाटन ठाण्यातील पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्लॅनेट बॉलिवूडचे मालक अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशी, जेएम जोशी आणि उर्वशी शर्मा जोशी परिवार उपस्थित होता.

गुंतवणूकदारांनी दृष्टिकोन बदलावा : उदघाटनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास व्हायला हवा, गुंतवणूकदारांनी ठाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आज ठाण्यात अनेक थ्रीस्टार हॉटेल्स आहेत. मात्र फाईव्ह स्टार हॉटेल नव्हते. पण आता हिरानंदानी इस्टेटमध्ये "प्लॅनेट बॉलिवूड" हे फाईव्हस्टार पहिले पंचतारांकीत हॉटेल तयार झाले आहे. दुसरीकडे आयपीएलचे खेळाडू हे ठाण्याच्या मैदानावर खेळत होते आणि वास्तव्यास मात्र मुंबईला जात होते. आता त्यांना ठाण्यातच "प्लॅनेट बॉलिवूड" या फाईव्हस्टार हॉटेल्सच्या रूपाने पंचतारांकित सुविधा मिळणार आहे. आता पुढच्या वेळेस ते ठाण्यातच प्लॅनेट बॉलिवूड या फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहतील. त्यामुळे ठाण्याच्या मैदानावर आयपीएल सामने होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. पंचतारांकित हॉटेल्सच्या सुविधेमुळे आतापर्यंत आयपीएल सामने ठाण्यात झाले नाहीत. पण आता ठाण्यात फाईव्हस्टार हॉटेल प्लॅनेट बॉलिवूड झालेले आहे. तेव्हा ठाण्यातही आगामी काळात आयपीएल सामने निश्चित होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.