ETV Bharat / state

Devendra Fadnavis : ...लोक टीका करतात, परंतु सरन्यायाधिशांना बारा वर्षांपासून ओळखतो... सत्कार कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचे विधान - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

सरन्यायाधीश उदय लळीत यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते (Chief Justice Uday Lalit was felicitated by Governor Koshyari) सत्कार करण्यात आला. दरम्यान, सरन्यायाधीशांना ओळखतो म्हटले की, लोक टीका करतात. परंतु, गेल्या बारा वर्षांपासून सरन्यायाधीश लळित यांना ओळखत असल्याची कबुली (DCM Devendra Fadnavis expressed his opinion) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. Devendra Fadnavis

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 5, 2022, 6:46 PM IST

मुंबई : सरन्यायाधीश उदय लळीत यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते (Chief Justice Uday Lalit was felicitated by Governor Koshyari) सत्कार करण्यात आला. दरम्यान, सरन्यायाधीशांना ओळखतो म्हटले की, लोक टीका करतात. परंतु, गेल्या बारा वर्षांपासून सरन्यायाधीश लळित यांना ओळखत असल्याची कबुली (DCM Devendra Fadnavis expressed his opinion) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राजभवनात ते बोलत होते. सरन्यायाधीश लळीत यांच्या सोबत आलेल्या अनुभवाचे फडणवीसांनी कथन केले. Devendra Fadnavis

महाराष्ट्राचे सुपुत्र उदय उमेश लळीत यांनी ऑगस्टमध्ये सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारला. 74 दिवसांच्या कार्यकाळानंतर 8 नोव्हेंबर रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात आज त्यांचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीशांच्या अनेक खुबी दिलखुलासपणे मांडल्या.

फडणवीस म्हणाले की, उदय लळीत यांचा सत्कार यापूर्वीच करायचा होता. मात्र इंग्लंडच्या महाराणींचे निधन झाल्यामुळे हा कार्यक्रम लांबला. राज्याचे सुपुत्र झाल्यानंतर त्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते होतो, म्हणजे राज्याच्या प्रत्येक नागरिकाच्या वतीने होतो. अलीकडे सरन्यायाधीश यांची ओळख सांगितली, तर लोक टीका करतात. मात्र, मी 2000 सालापासून सरन्यायाधीश लळित यांना ओळखतो. नागपूरमधील एका प्रकरणात ते आमचे वकील होते, आम्ही जेव्हा दिल्लीमध्ये जायचो, तेव्हा ते लिफ्ट वापरत नव्हते, कदाचित त्यामुळे ते फिट आहे. त्यांची नम्रता कायम बघायला मिळाली आहे. ते पुढच्या काळात निवृत्त होणार आहेत. पण ते कायम मार्गदर्शन करीत राहतील. तसेच न्यायदान वेगाने व्हावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच बॉम्बे हायकोर्टाचे नवीन संकुल लवकरच बांद्रा येथे होणार आहे, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया झाल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

सरन्यायाधीश उदय उमेश लळीत हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे ४९ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा जन्म - 9 नोव्हेंबर 1957 रोजी झाला. जून 1983 मध्ये अधिवक्ता म्हणून नामनिर्देशित. डिसेंबर १९८५ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी प्रॅक्टिस केली. जानेवारी १९८६ पासून दिल्लीत कायद्याचा सराव केला. एप्रिल 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त. विविध प्रकरणांमध्ये अॅमिकस क्युरी म्हणून काम केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये 2G प्रकरणांमध्ये खटल्यासाठी सिबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात आला. ते सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे दोन टर्म सदस्य होते. 13 ऑगस्ट 2014 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती. Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.