ETV Bharat / state

Chicago Quantum Exchange : अभिमानास्पद! शिकागो क्वांटम एक्सचेंजमध्ये आयआयटी बॉम्बेचा सहभाग - सुप्रतिक गुहा

Chicago Quantum Exchange : शिकागो क्वांटम एक्सचेंजमध्ये संशोधन करण्यासाठी जगातील पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना सहभागी होण्याचा मान मिळालाय. अभिमानास्पद म्हणजे यात आयआटी बॉम्बेला देखील संधी मिळालीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर रोजी G20 परिषदेत झालेल्या बैठकीत याची घोषणा केलीय.

शिकागो क्वांटम एक्सचेंजमध्ये आयआयटी बॉम्बेचा सहभाग
Chicago Quantum Exchange
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 5:09 PM IST

मुंबई (Chicago Quantum Exchange) : दिल्लीत G20 परिषद नुकतीच आज सुरू झालीयं. यात अमेरिकेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने भारतासोबत संयुक्त करारावर स्वाक्षरी केलीय. यामुळे शिकागो क्वांटम एक्सचेंजमध्ये आयआयटी बॉम्बेला आंतरराष्ट्रीय विद्यापीठ म्हणून सामील केलय. आयआयटी बॉम्बे तसंच देशासाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर रोजी G20 परिषदेत झालेल्या बैठकीत याची घोषणा केलीय. (Chicago Quantum Exchange)

आयआयटी बॉम्बे करणार शंशोधन : शिकागो क्वांटम एक्स्चेंज हे अभियांत्रिकी विज्ञानात संशोधन करणारे जगातील एक प्रगत बौद्धिक केंद्र आहे. यात अनेक देश सदस्य आहेत. या शिकागो क्वांटम एक्सचेंजमध्ये जगातील पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना सहभागी होण्याचा मान मिळालाय. यात आता आयआयटी बॉम्बेला (IIT Bombay) संशोधनात सहभागी करण्याचं अमेरिकेनं निश्चित केलयं. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या ऑर्गान नॅशनल लायब्ररी आणि फर्मिंग नॅशनल एक्सलेटर लॅबोरेटरी, एलिनोय युनिव्हर्सिटी यांच्या पुढाकाराने शिकागो क्वांटममध्ये प्रगत विज्ञान संशोधन केलं जातं. याठिकाणी आता आयआयटी बॉम्बेसुद्धा क्वांटम माहिती विज्ञान, हवामान विज्ञान, ऊर्जा विज्ञान, प्रगत मायक्रो इलेक्ट्रॉनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विज्ञान आणि डेटा विज्ञान यासारख्या क्षेत्रात सहकार्याने संशोधन करेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 9 सप्टेंबर 2023 रोजी या संदर्भात घोषणा केलीय.

दुसरा सुपर कम्प्युटर तयार करण्यात भारताचा सहभाग : जगातील दुसरा क्वांटम सुपर कम्प्युटर तयार करण्यासाठी शिकागो विद्यापीठ, टोकियो विद्यापीठ, आयबीएम, गुगल, अमेरिकेतील काही विद्यापीठांसह आयआयटी बॉम्बेचा यात सहभाग असेल. जगातील विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात सखोल संशोधन करण्यासाठी ही भागीदारी केली गेलीय. यात आयआयटी बॉम्बेला देखील सहभागी होता येणार आहे. यासंदर्भात शिकागो दिल्ली संयुक्त केंद्राचे संचालक सुप्रतिक गुहा यांनी सांगितलं की, "अभियांत्रिकी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारत अधिक संशोधन करू इच्छितो. यासाठी शिकागो विद्यापीठात इतर विद्यापीठा सोबत सहकार्य करण्यास आणि अमेरिका भारत संशोधन क्षेत्रात भागीदारी करण्यास इच्छुक आहे." सुप्रतिक गुहा है प्रिझर स्कूल ऑफ मॉलिक्युलर इंजिनिअरिंग अमेरिकाचे प्राध्यापक आहेत, तसेच ऑर्गन नॅशनल लायब्ररी भौतिक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे सल्लागार देखील आहेत.

हेही वाचा :

  1. Protest of IIT Bombay students : अखेर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाची दखल; 4 विद्यार्थ्यांना फी ठरविणाऱ्या समितीवर घेतले
  2. Joe Biden reach Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू, 'या' मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
  3. Daksh Boopathi interview: १२ वर्षांचा दक्ष मृदंग वाजवून जी-२० परिषदेत पाहुण्यांच करणार स्वागत, पहा विशेष मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.