मुंबई: महाराष्ट्र राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकिय, धार्मिक वातावरणं चांगलचं तापलं आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari on Shivaji Maharaj) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गडकरींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गडकरी छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहेत, असं वक्तव्य अभिमानाने करताना दिसत आहेत. यामुळे गडकरींनी अप्रत्यक्षरीत्या राज्यपाल चुकलेच, असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत. pic.twitter.com/QOe2l7A7tM
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) November 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत. pic.twitter.com/QOe2l7A7tM
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) November 21, 2022छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत. pic.twitter.com/QOe2l7A7tM
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) November 21, 2022
काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी? महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते. नव्या काळातले आदर्श बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आहेत हे वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांनी अशी वक्तव्यं करून चर्चांचा आणि वादांचा धुरळा उडवून दिला आहे.
राज्यपाल गोत्यात- दरम्यान, आपल्या बेलगाम विधानांमुळे राज्यपाल चांगलेचं गोत्यात आले आहेत. खा. उदयनराजे, (MP Udayanraje) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आदिंनी राज्यपालांना हाकलुन द्यावं, अशीचं मागणी केली आहे. राज्यातुन रोष वाढतचं चालला आहे.