मुंबई - छत्रपती संभाजीराजे यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपला आहे. छत्रपती संभाजी राजे आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मात्र आज सकाळी साडे अकराच्या सुमारास छत्रपती संभाजीराजे हे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगला येथे भेट घेणार आहेत. छत्रपती संभाजीराजे आणि देवेंद्र फडणीस यांच्या भेटीच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. संभाजी राजे भारतीय जनता पक्षात जाणार आहेत म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत घोषणा करतील अशी शक्यता ही राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीराजे घेणार राजकीय भूमिका - गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती संभाजीराजे कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जवळपास सर्वच पक्षाकडून छत्रपती संभाजीराजे यांना पक्षात घेण्याचा निमंत्रण आहे. मात्र अद्याप संभाजीराजे यांनी याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही. तसे छत्रपती संभाजीराजे आपला पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणीस यांच्या भेटीनंतर छत्रपती संभाजीराजे काय भूमिका स्पष्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.