ETV Bharat / state

छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षाचा इतिहास महाराष्ट्राला प्रेरणा देत राहील - अजित पवार

छत्रपती संभाजी महाराज राज्यकारभारात,युद्धनीतीमध्ये कुशल होते. मराठीसह हिंदी, संस्कृत भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची ग्रंथसंपदा ही त्यांच्या असामान्य विद्वत्तेचे अलौकिक बुद्धीमत्तेचे उदाहरण आहे, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : May 14, 2020, 11:28 AM IST

मुंबई- छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य, स्वराज्य बाणा, पुरोगामी विचार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी सलग नऊ वर्षे संघर्ष केला. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यांचा संघर्षमय इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजी महाराज अखेरच्या श्वासापर्यंत लढले. ते राज्यकारभारात, युद्धनीतीमध्ये कुशल होते. मराठीसह हिंदी, संस्कृत भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची ग्रंथसंपदा ही त्यांच्या असामान्य विद्वत्तेचे अलौकिक बुद्धीमत्तेचे उदाहरण आहे, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

छत्रपती संभाजी राजांनी रणांगणावर शौर्य गाजवले. युद्धनीती, राजनीती कौशल्यांचा उपयोग करुन नऊ वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज, तसेच अंतर्गत शत्रूंविरुध्द लढा दिला. स्वराज्य रक्षणासाठी प्राणाचे बलिदान दिले. त्यांनी दिलेला लढा, केलेला संघर्ष महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन करताना व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.