मुंबई Chhagan Bhujbal Reaction : ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) आव्हान देणारी याचिका बाळासाहेब सराटे यांच्या वतीनं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल झाली होती. त्याबाबत आज मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षित आहे. परंतु न्यायालयात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी तांत्रिक काम म्हणून केवळ सही करण्यासाठी आले असता, माध्यमांनी त्यांना गरडा घातला. त्यावेळेला त्यांनी म्हटलं की,आंदोलन करून काहीजण ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करत आहेत. आता न्यायालयात देखील आरक्षणाला धक्का लावला जात आहे.
ओबीसी तरी खपवून घेतील का : छगन भुजबळ यांनी म्हटलं की, 2018 साली याचिका दाखल झाली होती. ओबीसी आरक्षण संदर्भात पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी आहे. म्हणजे सर्व कायदेशीर प्रक्रिया केल्या गेल्या आणि त्याला पुन्हा आव्हान दिलं जात आहे. मी हायकोर्टात आलो होतो एका तांत्रिक कामासाठी. मात्र कॅबिनेट बैठक असल्यामुळं परत निघालो. कुणबी सर्टिफिकेट घ्यायचं आणि ओबीसींमध्ये यायचं. त्यामुळं जे ओबीसी आहेत ते बाहेर फेकले जाणार आहेत. हे ओबीसी प्रवर्ग खपवून घेणार नाही.
ओबीसींच्या हक्कासाठी याचिकांवर लक्ष ठेवून आहोत : ओबीसी आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये किंवा कोणत्याही न्यायालयामध्ये याचिका दाखल होतात. परंतु या सर्व याचिकांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. छोट्या राज्यातील कोट्यवधी ओबीसी प्रवर्गातील शेकडो जातींच्या विकासाचा मुद्दा आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्या त्याला आमचा विरोध नाही : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात आमचा कोणताही विरोध नव्हता आणि नाही. मात्र, ओबीसींवर अन्याय का?
मी या ससंदर्भात राज्य महाधिवक्ता यांची आज भेट घेतली. त्यांच्यासोबत याबाबत चर्चा केली. कायदेशीर बाबी आम्ही समजावून घेत आहोत पडताळून पाहत आहोत. जेव्हा न्यायालयात जाण्याची वेळ येईल त्यावेळेला आम्ही बाजू मांडू.
ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम : एका कुणबी व्यक्तीला प्रमाणपत्र मिळालं आता त्याच्या घरच्या लोकांना त्याच्या सासरच्या माहेरच्या अशा हजारो लोकांना ते प्रमाणपत्र पाहिजे आहे. याच्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होऊ शकतो. सगळेच जर कुणबी झाले म्हणजेच मग ओबीसींच्या आरक्षणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या 274 पेक्षा अधिक जाती आहेत त्यांचा शैक्षणिक नोकरीबाबत राजकीय सर्व आरक्षणावर परिणाम होणार आहे. ओबीसीचं आरक्षण संपणारच त्यापेक्षा मराठा मंडळींनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्वतंत्र आरक्षण घ्यावं.
हेही वाचा -
- Chhagan Bhujbal On Ajit Pawar Dispute : हो मी अजित पवारांशी मोठ्या आवाजात बोललो; मात्र... छगन भुजबळांनी सांगितलं खरं कारण
- Cabinet Meeting Today : मराठा आणि ओबीसी आरक्षण वाद सुटेना; आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा, वाचा सविस्तर
- chhagan bhujbal on Maratha reservation: 2 दिवसांत कुणबी नोंदीचा आकडा कसा वाढला-छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावरून सवाल