ETV Bharat / state

MS Dhoni Surgery : महेंद्रसिंह धोनीच्या पायावर पार पडली शस्त्रक्रिया - Mahendra Singh Dhoni

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज एम. एस. धोनी याच्यावर आज मुंबईत शस्त्रक्रिया पार पडली आहे. मुंबईतील अंधेरी येथील कोकिळाबेन रुग्णालयात धोनीवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली.

Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh Dhoni
author img

By

Published : Jun 1, 2023, 6:50 PM IST

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्स कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर आज मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या संघाला पाचव्यांदा विजेतेपद पटकावून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याच्या पायाला 31 मार्च रोजी दुखापत झाली होती. त्यानंतर तो दुखापत ग्रस्त पायानेच उर्वरित सामने खेळत होता. आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर धोनी लगेचच मुंबईत उपचारासाठी दाखल झाला. त्याने अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेतला.

पार पडली शस्त्रक्रिया : मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयातील स्पोर्ट्स मेडिसिनचे संचालक डॉक्टर दिनशा पारदिवाला यांच्याकडे धोनीने उपचारासाठी आला होता. डॉक्टर पारधी वाला यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतवर शस्त्रक्रिया केली होती. पारडीवाला हे सुप्रसिद्ध अस्थिव्यंग तज्ञ आहेत. डॉक्टर दिनशॉ परदीवाला यांनी धोनीच्या दुखापतग्रस्त पायावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली आहे.

सीएसकेकडून डॉक्टरांचे पथक : आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर धोनीने सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाला आपण मुंबईला उपचारासाठी रवाना होत असल्याचे कळवले होते. त्यानंतर धोनोसाठी चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने डॉक्टर मधु थोटापिल यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे एक पथक मुंबईला पाठवले होते. या शस्त्रक्रियेनंतर पुढील हंगामापूर्वी धोनी पूर्णपणे खेळण्यासाठी बरा होईल असा दावा सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी केला आहे.

धोनी पुढील हंगाम खेळणार का? : मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात धोनी याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता महेंद्रसिंग धोनी पुढील हंगामात खेळणार का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात बोलताना सीएसके चे काशी विश्वनाथ म्हणाले की यासंदर्भात संघ व्यवस्थापनाने कोणताही विचार अद्याप केलेला नाही, मात्र पुढील हंगाम खेळायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे धोनीवर अवलंबून असेल. तो ज्याप्रमाणे म्हणेल त्याप्रमाणे पुढील गोष्टी ठरवता येतील, मात्र सध्या तरी याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - IPL 2023 : मॅच हारल्यानंतर पंड्याने केले धोनीचे अभिनंदन ; म्हणाला, 'फायनलमध्ये..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.