ETV Bharat / state

खासगी जेटसह चार्टर्ड हेलिकॉप्टरही उड्डाणासाठी सज्ज! - खासगी विमानसेवा

गोंधळ आणि अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी सर्व स्थानिक मार्गांवर खासगी विमाने, चार्टर्ड उड्डाणे आणि हेलिकॉप्टर पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Chartered helicopter
चार्टर्ड हेलिकॉप्टर उड्डाणासाठी सज्ज
author img

By

Published : May 26, 2020, 5:40 PM IST

मुंबई - गोंधळ आणि अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने मंगळवारी सर्व स्थानिक मार्गांवर खासगी विमाने, चार्टर्ड उड्डाणे आणि हेलिकॉप्टर पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना विषाणू संकटाच्या दरम्यान संबंधित राज्य सरकार प्रवाश्यांना राज्यात प्रवेश करण्यास परवानगी देतात की नाही यावर हवाई सेवा देखील अवलंबून आहे. हा आदेश जारी करताना मंत्रालयाने सांगितले की, नियमितपणे स्थानिक प्रवासी उड्डाणांप्रमाणेच ‘नॉन-शेड्यूल आणि खासगी विमान' प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना समान मार्गदर्शक तत्वे लागू होतील.

थर्मल स्क्रिनिंग साठी 45 मिनिटांपूर्वी प्रवाशांना येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वृद्ध, गर्भवती स्त्रिया, आरोग्याच्या समस्या असलेल्या प्रवाशांना असुरक्षित व्यक्तींना हवाई प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे हवाई रुग्णवाहिका सेवेस लागू होणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. ऑपरेटर आणि प्रवासी यांच्यात परस्पर मान्यताप्राप्त अटींनुसार हवाई प्रवासाचे शुल्क (चार्टर्ड फ्लाइट्सवर) असेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. शिवाय अशा फ्लाइटच्या प्रवाश्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‌ॅप असणे अनिवार्य आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.