मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आज त्यांचे पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाकडून हे आरोपपत्र सक्तवसुली संचालनालय कोर्टात सादर करण्यात आले.
25 जूनला करण्यात आलीये अटक -
अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे अनिल देशमुख यांचे सचिव होते. या दोघांना 25 जून रोजी अटक करण्यात आली होती.
हेही वाचा - परमबीर सिंग गायब? सुटीवर असलेले परमबीर सिंग गेले कुठे? चर्चांना उधाण
सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. यानंतर ईडी याप्रकरणाचा तपास करत आहेत.
आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना पाचवेळा समन्स बजावले आहेत. मात्र, पाचही वेळा देशमुख प्रकृतीचे कारण देत ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत.
ईडीने काय म्हटले?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की, सध्या अनिल देशमुख कुठे आहेत याची माहिती नाही. मात्र, अनिल देशमुख हे सध्या दिल्लीमध्ये असल्याचा दावा त्यांच्या वकीलांकडून केला जात आहे.
हेही वाचा - 'या' कारणामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल...