मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत अनिक्षा जयसिंघानी हिने ओळख केली. मैत्री केली आणि त्यानंतर अनिल जयसिंगाने याने मुलीमार्फत अमृता फडणवीस यांना जाळ्यात अडकवण्यासाठी बनावट पद्धतीने सापळा रचून लाच देण्याचा आणि खंडणीचा प्रयत्न केला होता. यानंतर त्यांनी मलबारील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील केली होती. एफआयआर नोंदवल्यानंतर या बाप आणि लेकीला अटक करण्यात आली. काही शर्ती आणि अटीवर अनिक्षाला जामीन दिला गेला. मात्र अनिल जयसिंघानी हा पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे.
१३ साक्षीदारांचा उल्लेख : अनिल जयसिंगाने आणि मुलगीअनिक्षा जयसिंघानी आणि त्यांचा चुलत भाऊ यांच्या संदर्भात तपास करत असताना तपास अधिकारी एसीपी रवी सरदेसाई यांनी 733 पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात पोलिसांनी 13 साक्षीदारांचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला भादवि प्रतिबंधक कायद्याच्या कलम 8 (भ्रष्ट किंवा बेकायदेशीर मार्गाने, सार्वजनिक सेवकावर प्रभाव पाडण्यासाठी) आणि 12 (कलम 7 किंवा 11 मध्ये परिभाषित केलेल्या गुन्ह्यांना उत्तेजन देण्यासाठी शिक्षा) आणि 120 (ब) कट रचणे अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र यात नंतर कलम 385 (खंडणी) देखील जोडण्यात आला.
खंडणी उकळण्याचा प्रयत्न : पोलिसांना या प्रकरणात जर पुढे आणखी पुरावे मिळाले तर सीआरपीसीचे कलम 173 (8)चा देखील गुरुवारी दाखल केलेल्या आरोप पत्रात समावेश केलेला आहे. अमृता फडणवीस यांनी 20 फेब्रुवारी रोजी मलबार हिल पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. तक्रारीत वडील अनिल जयसिंघानी आणि मुलगी अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल केले. धमकी देत त्यांच्याकडून 10 कोटी रुपये खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला होता. मलबार हिल पोलिसांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याच्या प्रयत्न आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली अनिल जयसिंघानी आणि निर्मलला 20 मार्च रोजी गुजरात येथून अटक केली होती.
हेही वाचा :