ETV Bharat / state

Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण, मुंबई एनआयए न्यायालयात ११ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल - उमेश कोल्हे नुपूर शर्मा यांना समर्थन

उमेश कोल्हे हत्याकांडप्रकरणी ( Umesh Kolhe Murder Case ) राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई एनआयए न्यायालयात ११ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. अमरावती जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये सुरुवातीला हा गुन्हा 22 जून रोजी नोंदवण्यात आला होता. NIA ने 2 जुलै रोजी पुन्हा नव्याने अधिक तपासासह गुन्हा नोंदवला होता.

उमेश कोल्हे हत्याकांडप्रकरणी मुंबई एनआयए न्यायालयात ११ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

author img

By

Published : Dec 16, 2022, 5:02 PM IST

Updated : Jan 1, 2023, 7:06 AM IST

मुंबई - अमरावतीचे फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्याकांडप्रकरणी ( Umesh Kolhe Murder Case ) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी मुंबई एनआयए न्यायालयात अटक केलेल्या ११ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल ( Chargesheet filed against 11 accused ) केले. आरोपपत्रात मुबशीर अहमद, शाहरुख खान, अब्दुल तौशीफ शेख, मोहम्मद शोएब, अतीब रशीद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाज, मुस्फीक अहमद, शेख शकील आणि शाहीम अहमद यांची नावे आहेत.

नुपूर शर्मा यांना समर्थन : अमरावती जिल्ह्यातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये सुरुवातीला हा गुन्हा 22 जून रोजी नोंदवण्यात आला ( Umesh Kolhe support Nupur Sharma ) होता. NIA ने 2 जुलै रोजी पुन्हा नव्याने अधिक तपासासह गुन्हा नोंदवला. तपासानंतर आता 11 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावसायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, हत्येच्या 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले.

मारेकऱ्यांचा दुचाकीवरून पळ : त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले. त्यामुळे उमेश यांनी दुचाकी थांबविली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने चाकूने उमेश यांच्या गळ्यावर वार केला तर ईतरांनीही मारहान करण्यास मदत केली. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत, सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली.

Last Updated : Jan 1, 2023, 7:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.