ETV Bharat / state

आग्रीपाड्यातून 58 लाखांची चरस जप्त, दोन ड्रग्ज तस्करांना अटक

अँटी नार्कोटिक्स सेल, वरळी युनिटच्या पथकानं मुंबई शहरात मोठी करवाई केलीय. सायरस अव्हेन्यू रोड, आग्रीपाडा येथे पोलिसांनी दोन तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून एक किलो 453 ग्रॅम आमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

two drug peddlers arrested
दोन ड्रग्ज तस्करांना अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 10:45 PM IST

आमली पदार्थ तस्करांना अटक

मुंबई : अंमली पदार्थ विरोधी सेलच्या वरळी युनिटने आगरी पाडा येथील बेबी गार्डनजवळ दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. लुकमान इरफान खान (वय 24), मोहम्मद फईम मोहम्मद वसीम खान (वय 33) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 58 लाख 12 हजार किमतीची चरस जप्त करण्यात आल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी दिली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी सेलच्या वरळी युनिटने एक किलो 453 ग्रॅम चरस जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत 58 लाख 12 हजार इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अंमली पदार्थ जप्त : अँटी नार्कोटिक्स सेल, वरळी युनिटच्या पथकानं मुंबई शहरातील अंमली पदार्थ विक्रेते, पुरवठादार आणि साठेबाजांचा शोध घेत असताना, या पथकाला सायरस अव्हेन्यू रोड, आग्रीपाडा येथे संशयास्पदरित्या वावरणारे लुकमान तसंच फईम,दोघे सापडले. बेबी गार्डन गेट जवळ त्यांची झडती घेतली असता आरोपीकडं एकूण 01 किलो 453 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ आढळून आले.

दोघांना अटक : आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीनुसार जप्त केलेल्या चरस किंमत अंदाजे 58 लाख 12 हजार इतकी आहे. चरस या अंमली पदार्थाचे सेवन केल्याने दीर्घकालीन श्वसन समस्या, रोगप्रतिकारक शक्ती, हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा उच्च धोका असतो. अंमली पदार्थासह ताब्यात घेतलेल्या दोन आरोपी इसमाविरुद्ध NDPAS कायदा 1985 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा -

  1. ११ कोटींचा गुटखा गुन्हे शाखेच्या पथकाने पालघर येथून केला जप्त
  2. अनैतिक संबंधाच्या संशयावरून रिक्षाचालकाचा खून, मृतदेह खाडीत फेकला
  3. वायग्रासारख्या औषधांची विक्री करण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फसवणूक, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.