मुंबई - जिल्हानिहाय पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आले आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची, तर भंडारा जिल्हा पालकमंत्रिपदी डॉ. विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - अश्विनी बिद्रे खून प्रकरण : 'यामुळे' सरकारी वकील सोडणार खटला
कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारण्यास बाळासाहेब थोरात यांनी नकार दिला होता. नवीन लोकांना संधी द्या, असे थोरात म्हणाले होते. तसेच सतेज पाटील यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. या नियुक्त्यांवरून मंत्री नाराज असल्याचेही बोलले जात होते, तर विश्वजीत कदम यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत.