मुंबई - काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अनपेक्षीत मुसंडी मारल्याने व सर्व एग्झीट पोल चुकल्याने भाजपच्या गोटात म्हणावी अशी आनंदाची लहर दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यात बैठक होणार आहे.
भाजपने ठरवलेला 140 जागांचा आकडा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गाठणं भाजपला शक्य झाले नाही. त्यामुळे आता शिवसेनेची कशा पद्धतीने जुळवून घ्यायचं, सेनेने पुढे केलेला 50-50 चा फॉर्मुला मान्य करायचा अथवा नाही. याबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडत असल्याची चर्चा आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही वर्ष बंगल्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. वर्षा बंगल्यावर नक्की काय वातावरण आहे याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी..