ETV Bharat / state

ICICI Bank scam case : चंदा कोचर यांची सीबीआय विरोधात सत्र न्यायालयातील याचिकेवर 3 जानेवारीला होणार सुनावणी - दीपक कोचर आणि धूत

आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणात (ICICI Bank scam case) सीबीआय अटक केलेल्या आयसीआयसी बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर (Chanda Kochhar) त्यांच्या संदर्भात आयसीआयसी बँकेने दिलेले पत्र सीबीआय दिले नसल्याने या विरोधात चंदा कोचर यांच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयातील (session court ) विशेष सीबीआय कोर्टात याचिका (Chanda Kochhar petition against CBI) दाखल करण्यात आली होती. या अर्जावर आज सोमवारी दिनांक 2 जानेवारी रोजी होणार मात्र आज ही सुनावणी होऊ शकले नाही ही सुनावणी उद्या 3 जानेवारी होणार आहे. आरोपी चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत सध्या 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Chanda Kochhar
कोचर दाम्पत्य
author img

By

Published : Jan 2, 2023, 9:09 PM IST

मुंबई : आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणात (ICICI Bank scam case) सीबीआयने चंदा कोचर यांच्यावर खटला चालवण्यास बँकेकडून मंजूरी देण्यासंदर्भात आयसीआयसीआय बँकेने सीबीआयला 9 जुलै 2021 रोजी लिहिलेल्या पत्राच्या प्रत दिली नसल्याने चंदा कोचर यांनी याचिका दाखल (Chanda Kochhar petition against CBI) केली होती. हे पत्र चंदा कोचर यांचे वकील अमित देसाई आणि कुशल मोर यांच्या युक्तिवादाच्या केंद्रस्थानी होते. पत्राचा संदर्भ देत, वकिलांनी दावा केला होता की बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामुळे कोणतेही चुकीचे नुकसान झाले नाही. मात्र त्याची प्रत बचाव पक्षाला देण्यात आली नाही त्यामुळे विशेष न्यायालयासमोर औपचारिक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर उद्या (3 जानेवारी) सुनावणी होणार आहे.

याचिकेवर होणार सुनावणी : या अर्जावर सीबीआयने दावा केला आहे की हे प्रकरण तपासाच्या टप्प्यात आहे आणि या टप्प्यावर या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही कागदपत्रावर दावा करण्याचा आरोपींना अधिकार नाही. याशिवाय सीबीआयने सांगितले की हे पत्र तपास अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या रेकॉर्डचा भाग आहे. आरोपीच्या कोठडीची मागणी करताना ते न्यायालयासमोर सादर केले गेले. त्यामुळे सीबीआयने म्हटले आहे की याचिका कायद्याने राखता येणार नाही. कोर्ट सोमवारी या याचिकेवर युक्तिवाद होणार आहे.

कोचर दाम्पत्य सध्या कारागृहात : या प्रकरणातील तीनही आरोपींना विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर सीबीआयचे वकील ए लिमोसिन यांनी न्यायालयाला त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची विनंती केली कारण ते सर्व प्रभावीशाली व्यक्ती आहेत या खटल्यातील इतर साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. सीबीआयने त्यांच्या सीबीआय कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी केली नसल्याने विशेष न्यायालयाने तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. चंदा कोचर यांना भायखळा महिला कारागृहात तर दीपक कोचर आणि धूत यांना आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आले आहे.

पदाचा गैरवापर केल्याचा आरोप : 2009 मध्ये 300 कोटी रुपयांच्या व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणात दोघांना अटक झाली होती. मात्र गेल्यावर्षी त्यांची जामिनावर सुटका झाली. मुंबई सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. याआधी दोघांनाही ईडीने अटक केली होती. ईडीकडूनही याप्रकरणी चौकशी सुरू असून सप्टेंबर 2020 मध्ये दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती. मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली ही अटक झाली होती. व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना मोठा हादरा बसला असून सीबीआयने चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली आहे. चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण : चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. एप्रिल 2012 मध्ये हे कर्ज दिले गेले होते. यातील 2 हजार 810 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते आणि 2017 मध्ये ते बुडीत कर्ज म्हणून जाहीर केले गेले होते. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू होती. त्यानंतर आज अटकेची कारवाई करण्यात आली. चंदा कोचर यांनी बँकेचे धोरण आणि नियम मोडून व्हिडीओकॉन समूहाला कर्ज मंजूर केल्याचा आरोप आहे. व्हिडीओकॉनचे एक भागधारक अरविंद गुप्ता यांनी याबाबत पत्र लिहून पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबीकडे तक्रार केली होती.

चंदा कोचर यांची कारकीर्द : 1984 मध्ये ट्रेनी व्यवस्थापक म्हणून आयसीआयसीआय बँकेत रुजू झालेल्या चंदा कोचर यांचा यशाचा आलेख चढता राहिला. उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, कॉर्पोरेट बिझनेस हेड, मुख्य वित्त अधिकारी अशा विविध पदांवर काम केल्यानंतर 2009 मध्ये त्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाव्यवस्थापक बनल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.