ETV Bharat / state

शेतकरी व कामगारांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा ८ डिसेंबरला चक्का जाम - मुंबई कामगार संघटना चक्का जाम आंदोलन न्यूज

केंद्र शासनाने पावसाळी अधिवेशनात घाईमध्ये काही शेतकरी विधेयकं मंजूर करून त्यांचे कायद्यात रुपांतर केले. या कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरियाणा सह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. त्याला आता कामगार संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.

Agitation
आंदोलन
author img

By

Published : Dec 3, 2020, 5:24 PM IST

मुंबई - शेतकरी विरोधी कृषी कायदा आणि कामगार कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील लाखो शेतकरी दिल्लीतील रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील ७७ संघटना एकवटल्या आहेत. मोदी सरकारने शेतकरी आणि कामगारांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर ८ डिसेंबरला देशभरात १ कोटी वाहन चालक चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे विश्वास उटगी यांनी दिला आहे.

'या' मागण्यांसाठी आंदोलन -

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमी भावाचे रास्त संरक्षण द्या. केंद्र सरकारने केलेले तीन नवीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा. रेशन यंत्रणा बंद करण्याचा डाव हाणून पाडा, अशा प्रमुख मागण्या या आंदोलकांच्या आहेत. यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात मुंबईच्या भारतमाता थिएटरजवळ आज इंटकसह विविध ७७ संघटनांकडून आंदोलन करण्यात आले.

...अन्यथा चक्का जाम -

शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जात आहे. आज एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन आणखी तीव्र करण्याची हाक कामगार संघटना संयुक्त कृती समन्वय समितीने दिली आहे. या आंदोलनाला सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. सर्व कामगार, कर्मचारी शेतकऱ्यांना न्याय द्या, असे बिल्ले लावून काम सुरू आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन शेतकरी आणि कामगारांना न्याय घ्यावा. अन्यथा येत्या ८ डिसेंबरला देशभरातील वाहतूक संघटनांचे १ कोटी चालक-मालक आपली वाहने बंद करून चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा विश्वास उटगी यांनी दिला आहे.

शेतकरी व कृषी मंत्र्यांची बैठक सुरू -

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या 'दिल्ली चलो' आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे शेतकरी नेते आणि केंद्र सरकामध्ये चर्चा सुरू आहे. या बैठकीत संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या चहापाणावर आणि जेवणावरही बहिष्कार घातला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.