ETV Bharat / state

पुढील वर्षापासून तालुकास्तरावर 'सीईटी'; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

author img

By

Published : Oct 24, 2020, 7:39 PM IST

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) आयोजन तालुकास्तरावर होणार आहे. यासाठीची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई - राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आतापर्यंत आयोजित केली जाणारी आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) आयोजन तालुकास्तरावर होणार आहे. यासाठीची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सामंत यांच्या नवीन घोषणेमुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटीला सामोरे जाण्याचा मार्गही यातून खुला होणार आहे.

कोरोना आणि त्यातच मागील दीड आठवड्यात राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे, या पार्श्वभूमीवर सीईटीला बसलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी ही घोषणा केली. तसेच गेल्या वर्षी उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत ( व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ) सन २०१९ – २०२० मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सदर करू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचा प्रस्ताव सीईटीनी तत्काळ उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवावा, शासन यावर विशेष बाब म्हणून निर्णय घेईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कोरोना, अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्यांची पुन्हा परीक्षा

कोविड-१९मुळे आणि अतिवृष्टी झाल्याने आलेल्या अडचणी, यामुळे जे विद्यार्थी अभियांत्रिकी, औषधनिर्माण व कृषी अभ्यासक्रमाची सीईटी देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटीमार्फत पुन्हा परीक्षा आयोजित करण्यात येतील. यासाठी नोंदणी करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यामुळे २४ ऑक्टोबर २०२० रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. यापूर्वी ही तारीख 26 ऑक्टोबर २०२० अशी होती. याबाबच्या सूचना विभागास दिल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या विविध तक्रारीसाठी परीक्षांच्या कालावधीत तक्रार निवारण मंच तयार करण्यात यावेत, अशा सूचनाही यावेळी सामंत यांनी दिल्या.

विद्यापीठ कायद्यात सुधारणा

उच्च व तंत्र शिक्षण विभागातील संस्थांमध्ये माजी सैनिकांच्या पाल्यांना आतापर्यंत केवळ पाच टक्के जागा राखीव ठेवल्या जात होत्या. ती अट शिथिल करण्यात आली आहे. तर विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यासाठीचा जीआर नुकताच जाहीर करण्यात आला असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.

केंद्र सरकारने मागील महिन्यात जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणावर बोलताना सामंत म्हणाले की, या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह अनेक दिग्गज तज्ञांच्या समवेत कार्यबल गट म्हणजेच टास्क फोर्स तयार करण्यास मान्यता देण्यात आला असल्याची त्यांनीं माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.