मुंबई : 2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावा लागतो. त्या प्रवेशासाठी सीईटी म्हणजे केंद्रीय सामायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. याबाबत उशिरा का होईना शासनाने वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यामुळे मार्च ते जूनपर्यंत सर्व ऑनलाईन अर्ज प्रणाली चाचणी, परीक्षा आणि निकाल वेळेत लागतील असे शासनाने आज निर्णय घेत जाहीर केले आहे.
लाखो विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी अर्ज : राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लाखो विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणे अवघड असते. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा तर्फे म्हणजेच सीईटी सेलच्यावतीने या परीक्षा घेतल्या जातात. औषध निर्माण, अभियांत्रिकी, कृषी अभ्यासक्रम, शिक्षण शास्त्र अशा अनेक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेतात. प्रवेश हे सीईटीच्या गुणांवरच होत असल्याने विद्यार्थी बारावीच्या अभ्यासक्रमाकडे देखील एवढे महत्त्व देत नाही. तेवढे महत्त्व सीईटी परीक्षेला देतात.
सीईटी परीक्षा केंद्रावर मनुष्यबळ वाढवले : सामायिक प्रवेश परीक्षा करिता प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी एक नोडल लॉग उपलब्ध करून देण्यात येईल प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक प्रमुख एक व्यवस्थापक एक नेटवर्क तज्ञ आणि 25 विद्यार्थ्यांमागे एक समन्वयक शंभर विद्यार्थ्यांमागे एक सुरक्षारक्षक आणि शंभर विद्यार्थ्यांमागे एक महिला व पुरुष तपासणी तसेच एक मुख्य पर्यवेक्षक आणि इतर कर्मचारी देखील त्यांच्या दिमतीला असतील.
उमेदवारांना मदत करण्यासाठी विविध प्रणालींचा वापर : सीईटी कक्षाच्यावतीने एसएमएस ई-मेल आणि व्हाट्सअप या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. सीईटी व केंद्रीय प्रवेश प्रक्रिया दरम्यान आठवड्याचे सातही दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत एकूण दहा तास मदत कक्ष सुरू राहणार आहे. प्रवेश परीक्षेच्या आधी किमान तीन दिवस आणि परीक्षा संपल्यानंतर तीन दिवसापर्यंत हा मदत कक्ष 24 तास सात दिवसांसाठी सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या मदत कक्षाचा उपयोग होईल.
परिक्षांच्या नोंदणी तारखा : बीएड, एमएड सीईटी 2023 ऑनलाइन अर्ज 6 मार्च रोजी सुरू होऊन त्याचे निश्चिती करणे 16 मार्च 2023 पर्यंत असेल. तांत्रिक शिक्षणामध्ये एमबीए आणि एमएमएस यासाठीच्या सीईटीच्या परीक्षा तारखा 18 मार्च आणि 19 मार्च आहे. त्याच्या कॅप नोंदणी तारखा 5 एप्रिल ते 23 मे पर्यंत आहे. तर तांत्रिक शिक्षणामध्ये कम्प्युटर ऍडमिनिस्ट्रेशन साठीची सीईटीच्या परीक्षा तारखा 25 मार्च ते 26 मार्च अशा आहेत. त्यात नोंदणी तारखा 13 एप्रिल ते 30 मे 2023 पर्यंत आहे. उच्च शिक्षणामध्ये एलएलबी पाच वर्षाच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी 2 एप्रिल 2023 या परीक्षेच्या तारीख आहे. त्याची नोंदणी मुदत 9 एप्रिल ते 14 जुलैपर्यंत आहे.
अधिकृत वेबसाईटवर माहिती : एलएलबी तीन वर्षाच्या कोर्ससाठी 2-3 मे 2023 परीक्षा आहे. त्याची कॅप नोंदणी तारीख 22 मे ते 15 जुलै 2023 पर्यंत असेल. यासंदर्भात तपशीलासाठी सीईटीची राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी आणि उमेदवारांनी जाऊन भेट द्यावी असे आवाहन राज्य सीईटी कक्षाचे आयुक्त महेंद्र वार भुवन यांनी केले आहे.
हेही वाचा : 12th Maths Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर फुटल्या प्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल