मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांच्या संख्येत भर पडत असताना आणखीन एक चिंताजनक घटना समोर आली आहे. केंद्रीय सुरक्षा बलाच्या खारघर येथील मुख्यालयात नियुक्त असणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांपैकी 5 जवानांची कोरोना चाचणी यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आली होती. आता आणखी 6 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून 2 एप्रिल रोजी रात्री उशिरा 146 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याची आदेश जारी केले होते. यानंतर तात्काळ संबंधित जवानांची कोविड-19 टेस्ट घेण्यात आली. यापैकी 6 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तात्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका कमी झाला आहे. एमजीएम रूग्णालयात त्यांच्यासाठी स्वतंत्र 2 विंग तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
हेही वाचा - 'टाळ्या झाल्या, आता मेणबत्या लावा, पण रोजगार किती गेले सांगणार आहात का?'