ETV Bharat / state

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून दोन विशेष रेल्वे गाड्या - irctc

उन्हाळी सुट्टयांनिमित्त मध्य रेल्वेने मुंबई-फैजाबाद विशेष एक्स्प्रेस आणि मुंबई- कारैक्काल या दोन सुरू केल्या आहेत. पहिली गाडी १४ तर दुसरी १७ एप्रिलपासून धावणार आहे.

सुट्टयांसाठी विशेष रेल्वे गाड्या
सुट्टयांसाठी विशेष रेल्वे गाड्या
author img

By

Published : Apr 6, 2021, 5:28 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेकडून उन्हाळाच्या सुट्टया लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई-फैजाबाद / कारैक्काल दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक 01067 मुंबई-फैजाबाद विशेष एक्स्प्रेस १४ एप्रिल २०२१ पासून आणि 01017 मुंबई- कारैक्काल दरम्यान विशेष 17 एप्रिल 2021 पासून धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई-फैजाबाद विशेष एक्स्प्रेस...

ट्रेन क्रमांक 01067 विशेष एक्सप्रेस १४ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार आणि शनिवारी सायंकाळी 6 वाजता सुटेल. आणि फैजाबादला दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटाने पोहचेल. तर 01068 विशेष गाडी एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत फैजाबाद येथून दर गुरुवार आणि रविवारी १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी सकाळी ४.०५ वाजता पोहोचेल. या गाडीला मध्य रेल्वेवर ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, बुरहानपूर, आणि खंडवा स्थानकांवर थांबे असतील. या गाडीची संरचना १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, आणि ३ द्वितीय आसन श्रेणी असे एकूण 20 कोच असणार आहेत.

एलटीटी-कारैकाल साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस...

01017 विशेष गाडी १७ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी दुपारी 3.१५ वाजता सुटेल आणि कारैक्काल ‍येथे दुस-या दिवशी सायंकाळी 6.50 वाजता पोहोचेल. तर 01018 विशेष १९ एप्रिल २०२१ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कारैक्काल येथून दर सोमवारी दुपारी 2 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ‍येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8.20 वाजता पोहोचेल. या गाडीला थांबे मध्य रेल्वेवर ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, कलाबुरागी आणि वाडी रेल्वे स्थानकावर असतील. १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीयवातानुकूलित, १२ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी अशी गाडीची संरचना असेल.

गुरुवारपासून आरक्षण सुरू...
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01067 आणि 01017 या दोन्ही विशेष ट्रेनचे आरक्षण बुकिंग ७ एप्रिल २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.