मुंबई - मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेस, पुणे ते जसीडीह, लखनऊ, काझीपेट गाड्यांच्या डब्यांमध्ये कायमस्वरूपी वाढ केली आहे. ( Increase in coach of Koyna Express ) त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना अधिक सोयीस्कर होणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावर प्रवासी संख्या वाढत असल्याने मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी डब्यांमध्ये वाढ केली आहे. ( Central Railway on Koyna Express Coach )
कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्सप्रेस -
गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर ते मुंबई कोयना एक्सप्रेसला 24 फेब्रुवारीपासून आणि गाडी क्रमांक 11029 मुंबई ते कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसला 25 फेब्रुवारीपासून कायमस्वरूपी एक स्लीपर क्लासचा जादा डबा जोडण्यात येणार आहे. या गाडीला आता एक वातानुकुलीत तृतीय श्रेणी, चार स्लीपर क्लास, दोन वातानुकुलीत चेअर कार, नऊ द्वितीय श्रेणी आसन असणार आहे.
पुणे-लखनऊ एक्सप्रेस -
गाडी क्रमांक 11407 पुणे- लखनऊ एक्सप्रेसला, गाडी क्रमांक 22151 पुणे-काझीपेठ एक्स्प्रेसला 1 मार्चपासून आणि गाडी क्रमांक 22152 काझीपेठ - पुणे एक्स्प्रेसला, गाडी क्रमांक 11408 लखनऊ-पुणे एक्स्प्रेसला अनुक्रमे 2, 3 मार्च रोजी एक वातानुकुलीत तृतीय श्रेणीचा ज्यादा डबा जोडण्यात येणार आहे.
हेही वाचा - Mask Free Maharashtra : महाराष्ट्र मास्कमुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण
पुणे-जसीडीह एक्सप्रेस -
गाडी क्रमांक 11427 पुणे- जसिडीह एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12103 पुणे- लखनऊ एक्सप्रेसला 4 मार्चपासून आणि गाडी क्रमांक 11428 जसिडीह-पुणे एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12104 लखनऊ-पुणे एक्स्प्रेसला 6 मार्चपासून एक वातानुकुलीत तृतीय श्रेणीचा ज्यादा डबा जोडण्यात येणार आहे. या गाडीला आता एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, पाच वातानुकुलीत तृतीय श्रेणी, नऊ स्लीपर क्लास, चार द्वितीय श्रेणी आसनव्यवस्था आणि एक जनरेटर व्हॅन असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.