ETV Bharat / state

लंडनमधील आंबेडकरांच्या स्मारकाचा दर्जा कायम राहणार - रामदास आठवले

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकारतर्फे खरेदी करून तेथे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. त्या स्मारकात आंबेडकरी अनुयायांच्या होणाऱ्या गर्दीबाबत तक्रार झाली आहे. त्यामुळे लंडनमधील स्थानिक पालिका असलेल्या कॅमडेन कौन्सिलने या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
author img

By

Published : Aug 23, 2019, 8:37 PM IST

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकारतर्फे खरेदी करून तेथे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. त्या स्मारकात आंबेडकरी अनुयायांच्या होणाऱ्या गर्दीबाबत तक्रार झाली आहे. त्यामुळे लंडनमधील स्थानिक पालिका असलेल्या कॅमडेन कौन्सिलने या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या स्मारकाचा आंतरराष्ट्रीय दर्जा रद्द होऊ देणार नसल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

लंडनमधील आंबेडकरांच्या स्मारकाचा दर्जा कायम राहणार

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्क साधणार - आठवले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही. त्यासाठी त्वरित परराष्ट्र मंत्रालय आणि लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी आपण संपर्क साधणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानसूर्य म्हणून अवघे विश्व सन्मान करीत आहे. लंडनमधील पालिकेचा हा निर्णय ब्रिटन सरकारने रद्द करावा, यासाठी भारत सरकारतर्फे प्रयत्न करीत असल्याचे आठवले म्हणाले.

स्मारकाचे अस्तित्व कायम ठेवणार - राज्यमंत्री महातेकर
लंडनमधील हेनरी रोडवरील डॉ. बाबासाहोब आंबेडकर संग्रहालयास अन्यत्र हलविण्याचा लंडनमधील स्थानिक पालिकेचा निर्णय आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी लंडनच्या स्थानिक न्यायालयात महाराष्ट्र सरकारने अपील केले आहे. भारत सरकारतर्फेही ब्रिटन सरकारशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. ब्रिटन आणि भारत सरकारमध्ये चांगले संबंध असून, लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा दर्जा रद्द होऊ नये म्हणून सर्व स्तरावर प्रयत्न चालू आहेत. सर्व कायदेशीर उपाय करुन स्मारकाचे अस्तित्व कायम ठेऊ, असे मत यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.

क्वीन कौन्सिल यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपानुसार त्यांच्यासमोर महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी सिंघानिया अँन्ड को. सॉलिसिटर्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये तज्ज्ञ स्टीव्हन गॅझ्टोविच क्यूसी आणि चार्ल्स रोझ यांचा समावेश आहे. याबाबत सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार असून, त्यास महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याबाबत महाराष्ट्र शासन अतिशय गांभीर्याने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संबंधित स्थानिक संस्थेने उपस्थित केलेल्या आक्षेपांचे निराकरण करून हे स्मारक पूर्ण करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय पातळीवरील संपूर्ण कार्यवाही प्राधान्याने पार पाडली जाईल असेही महातेकर म्हणाले.

कोर्टाच्या निकालाला आणखी १ महिना लागणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे राजकारण लंडनच्या डॉ. आंबेडकर स्मारकाभोवती रंगेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Intro:Body:mh_mum_01_london_smarak_politics_7204684

आंबेडकरांच्या लंडमधील स्मारकाचे राजकारण

मुंबई:भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील निवासस्थान महाराष्ट्र सरकार तर्फे खरेदी करून तेथे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. त्या स्मारकात आंबेडकरी अनुयायांच्या होणाऱ्या गर्दीबाबत तक्रार झाल्याने लंडन मधील स्थानिक पालिका असलेल्या कॅमडेन कौन्सिलने या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या मुद्द्यावर राजकारण होणार असल्यानं राज्यसरकारनं कायदेशीर बाजू मजबूत करण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही त्यासाठी त्वरित परराष्ट्र मंत्रालय आणि लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाशी आपण संपर्क साधता आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानसूर्य म्हणून अवघे विश्व सन्मान करीत असून लंडनमधील पालिकेचा हा निर्णय ब्रिटन सरकार ने रद्द करावा यासाठी भारत सरकार तर्फे प्रयत्न करीत असल्याचे असल्याचे रामदास आठवले यांचे म्हणने आहे.

लंडन मधील हेनरी रोड वरील या संग्रहालयास अन्यत्र हलविण्याचा लंडनमधील स्थानिक पालिकेचा निर्णय आहे. हा निर्णय रद्द करण्यासाठी लंडन च्या स्थानिक न्यायालयात महाराष्ट्र सरकार ने अपील केले आहे. भारत सरकारतर्फे ही ब्रिटन सरकार शी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. ब्रिटन आणि भारत दोन्ही सरकार मध्ये चांगले संबंध असून लंडन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ नये म्हणून आपण सर्व स्तरावर प्रयत्न करीत असून सर्व कायदेशीर उपाय करुन स्मारकाचे अस्तित्व कायम ठेऊ असं सामाजिक न्यायराज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

क्वीन कौन्सिल यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांनुसार त्यांच्यासमोर महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी सिंघानिया अँन्ड को. सॉलिसिटर्स यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात क्वीन कौन्सिलपुढे महाराष्ट्र शासनाची बाजू मांडण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये तज्ज्ञ Mr. Steven Gasztowicz QC व प्लॅनिंग तज्ज्ञ Mr. Charles Rose यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार असून त्यास महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याबाबत महाराष्ट्र शासन अतिशय गांभीर्याने संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संबंधित स्थानिक संस्थेने उपस्थित केलेल्या आक्षेपांचे निराकरण करून हे स्मारक पूर्ण करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय पातळीवरील संपूर्ण कार्यवाही प्राधान्याने पार पाडली जातील असं महातेकर म्हणाले.
कोर्टाच्या निकालाला १ महीना लागणार असल्यानं विधानसभा निवडणुकीचं राजकारण लंडनच्या डॉ. आंबेडकर स्मारकाभोवती रंगेल अशी शक्यता आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.