ETV Bharat / state

Ajit Pawar On Adani : अदानी समूहासंदर्भात केंद्राने स्पष्टीकरण द्यावे - अजित पवार - Assembly Opposition Leader Ajit Pawar

अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाने जरी प्रत्युत्तर दिले असले तरीसुद्धा मागील अनेक दिवसापासून अदानी यांच्या कंपनी संदर्भामध्ये निरनिराळे प्रश्न समोर येत आहेत. याबाबत नक्की गौडगंबाल काय आहे? असा प्रश्न उपस्थित करत, या संदर्भामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण द्यावे, असं आवाहन राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Ajit Pawar On Adani
Ajit Pawar On Adani
author img

By

Published : Jan 31, 2023, 9:51 PM IST

Updated : Jan 31, 2023, 10:03 PM IST

मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्च अहवालाचा परिणाम अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागावर मोठ्या प्रमाणात झाला असून याबाबत अदानी समूहाने प्रत्युत्तर दिले आहे. परंतु या सर्व पार्श्वभूमीवर हिंडेनबर्गच्या अहवालातून अदानी समूहावर जे काही आरोप करण्यात आले आहेत त्याचा फटका जरी गौतम अदानी यांना बसला असला तरीसुद्धा सामान्य माणसांचे याबाबत अनेक प्रश्न आहेत. म्हणून या सर्वांची खातर जमा करण्यासाठी व याबाबत योग्य ते स्पष्टीकरण देण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

एलआयसी चे ७५ हजार कोटी अडकले : याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या राज्यात महागाई, बेरोजगारी यासारखे नवनवीन प्रश्न समोर येत असताना अदानी समूहाबाबत हिंडेनबर्ग च्या अहवालानंतर शेअर बाजार लाखो कोटीने पडतो काय? यात काय गौडगंबाल आहे, हे समजत नाही, असं सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुंबई प्रदेश पक्ष कार्यालयात ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, सध्या नक्की काय चालू आहे, ते समजत नाही. एकीकडे महागाई, बेरोजगारी असे प्रश्न आ वासून समोर असताना दुसरीकडे शेअर बाजार लाखो कोटीने घसरतो काय, त्याचबरोबर एलआयसी चे ७५ हजार कोटी अडकले आहेत, अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्या आहेत. नक्की यामध्ये वस्तुस्थिती काय आहे. यात हे समजत नाही. म्हणूनच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत लवकरात लवकर खुलासा करावा. तसेच ज्यांच्यावर आरोप झाले आहेत तीच कंपनी याविषयी बोलते व ज्यांनी आरोप केले आहेत ते बोलत आहेत. परंतु सरकारकडून मात्र कुठूनही याबाबत उत्तर येत नाही. मुद्दाम ही बदनामी सुरू आहे की काय ?असाही प्रश्न पडतो. म्हणूनच पाणी कुठे मुरतंय हे जनतेला समजलं पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.

आम्हालाही अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्हालाही या बजेटमधून अनेक अपेक्षा आहेत. मागील २० वर्षात सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री असताना, जर तो अपवाद सोडला व आत्ताचा देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद सोडला तर साडे सतरा वर्ष अर्थ मंत्रालय आम्हीच बघत होतो. गॅस, महागाई यात केंद्र सरकारने लक्ष घातलं पाहिजे. विविध विभागांचा निधी केंद्राने त्वरित दिला पाहिजे. रेल्वेचा निधी सुद्धा अडकून पडला आहे. तो महाराष्ट्राला भेटला पाहिजे. मुंबई- नाशिक- पुणे मार्गाबाबत या अगोदर सुद्धा देवेंद्र यांच्याशी मी चर्चा केली आहे. नगर,पुणे, नाशिक या कलेक्टरसोबत आमचे सरकार असताना पुढाकार घेतला होता. मुंबई - नाशिक - पुणे- मुंबई रेल्वे मार्ग लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे. यासाठी आमचं सर्वांचं एकमत होतं. यासाठी आम्ही कंपनी सुद्धा अस्तित्वात आणली. याबाबत २३ ते २४ स्टेशन सुद्धा आम्ही केले होते. परंतु घोड कुठेतरी अडकलं. आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत पुढाकार घेऊन त्यांनी ते अंतिम करायला हवं असंही अजित पवार म्हणाले.

काय सुरू आहे तेच कळत नाही? : पुढे अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक बोलतात. परंतु त्यांचा वेळ मिळत नाही. या दोघांचं काय चाललंय तेच कळत नाही. की आम्हाला ते खेळवत आहेत, असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला. फक्त वेळ मारून देण्याचे काम चालू आहे का? हेही समजत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सत्तेत नसताना सर्व बाबतीत सकारात्मक बोलणे सोप्प असतं, पण सत्तेवर आल्यावर ही तारेवरची कसरत असते असेही ते म्हणाले. कुठेही काही प्रयत्न होताना दिसत नाही आहेत. सध्या उद्योग, बॉलीवूड राज्यातून बाहेर चालला आहे. असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

हेही वाचा - State Cabinet Decisions : 'जय जय महाराष्ट्र माझा'ला राज्य गीताचा दर्जा, वाचा मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय

Last Updated : Jan 31, 2023, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.