मुंबई : दिवाळीच्या तोंडावर मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट (Central and Western Railway platform ticket) दर दहा रुपये वरून 50 रुपये वाढवलेले होते. त्याप्रमाणे पश्चिम रेल्वेने देखील आपल्या रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्म तिकीट दर पन्नास रुपये पर्यंत केले होते. मात्र हे तिकीट दर 1 नोव्हेंबर पासुन पूर्वत दहा रुपये (ticket fares will be normal again Rupees Ten) होणार आहे.
सणासुदीच्या हंगामात रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी लक्षात घेता, प्लॅटफॉर्म आणि एफओबीसह रेल्वे आवारातील प्रवाशांची संख्या नियंत्रित करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर 10 रुपयांवरुन 50 रुपये पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार तसेच एके सिंग यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ही तात्पुरती दरवाढ होती. ती 30 ऑक्टोबर पर्यंतच होती. 30 ऑक्टोंबर मध्यरात्री पासून प्लॅटफॉर्म तिकीट दर पूर्वीप्रमाणे सामान्य दराप्रमाणे म्हणजे 10 रुपयेच राहतील.
तर पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांना विचारले असता त्यांनीदेखील सणासुदीच्या काळापुरताच प्रचंड गर्दी वाढते ही गर्दी कमी होण्यासाठी म्हणून तिकीट दर तात्पुरत्या तारखेपर्यंत म्हणजे 30 ऑक्टोबर पर्यंतच वाढवलेले आहे त्यानंतर दर पूर्वीप्रमाणे 10 रुपये होतील.