मुंबई: सध्या महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांवर ईडीचे धाडसत्र सुरू असून या कारवाईवर संजय राऊत यांनी 'कितीही दबाव आणा आम्ही झुकणार नाही' असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांचे तपास कार्य सुरू असून या कारवाईवरून शिवसेनेत प्रचंड संतापाची लाट आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत ?
"देशाचा तिजोरीत सर्वात जास्त महसूल महाराष्ट्रातून जातो त्यामुळे इन्कम टॅक्स फक्त महाराष्ट्रातच आहे असा तपास यंत्रणांचा समज झाला आहे. त्यामुळेच कदाचित अधिकारी फक्त महाराष्ट्रातच धाडी टाकत असावेत. पण, यांच्या दबावापुढे आम्ही झुकणार नाही या सर्व हुकूमशाहीची नोंद जनता ठेवत आहे."
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे दबाव
"आशियातील सगळ्यात मोठी महानगरपालिका अशी मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. या महानगरपालिकेवर भाजपला सत्ता हवे आणि त्यासाठीच दबाव आणण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतोय आम्ही वाकणार नाही."
भाजपची भूमिका दुटप्पी
"आज मराठी भाषा दिवस आहे. पण, मराठी माणसा संदर्भात भाजपचे नेहमीच दुटप्पी भूमिका राहिली आहे. एका बाजूला मराठी माणूस, मराठी माणसांचे हक्क अशी ओरड करायची आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाला विरोध करायचा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यायचा नाही, अशी दुटप्पी भूमिका भाजपची नेहमीच राहिली आहे." "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात सुद्धा हे लोक राजकारण करत आहेत. आम्हाला श्रेया नको श्रेय कोणीही घ्या पण आमच्या मराठीचा मान राखा. भाजपचे नेते आणि पंतप्रधान सतत छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करत असतात. पण, त्याच महाराजांच्या भाषेसाठी आम्हाला दिल्ली दरबारी भीक मागावी लागत आहे." असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
-
I think there's Income & Tax only in Maharashtra, no Income & Tax in BJP-ruled states. Municipal Corporation polls are here,so central agencies have work only in Maharashtra & WB; no work in rest of India. All is well there: Sanjay Raut on I-T raids on state's leaders & ministers pic.twitter.com/44PzsJXx9Y
— ANI (@ANI) February 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I think there's Income & Tax only in Maharashtra, no Income & Tax in BJP-ruled states. Municipal Corporation polls are here,so central agencies have work only in Maharashtra & WB; no work in rest of India. All is well there: Sanjay Raut on I-T raids on state's leaders & ministers pic.twitter.com/44PzsJXx9Y
— ANI (@ANI) February 27, 2022I think there's Income & Tax only in Maharashtra, no Income & Tax in BJP-ruled states. Municipal Corporation polls are here,so central agencies have work only in Maharashtra & WB; no work in rest of India. All is well there: Sanjay Raut on I-T raids on state's leaders & ministers pic.twitter.com/44PzsJXx9Y
— ANI (@ANI) February 27, 2022
हेही वाचा : IT Raid On Yashwant Jadhav : तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरूच