मुंबई - कुर्ला पश्चिम येथील ख्रिश्चन गावात धर्मगुरु येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता चर्चच्या धर्मगुरुंनी प्रार्थना केली त्यांच्या मागे नागरिकांनी प्रार्थना केली. यावेळी होली क्रॉस चर्च परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
हेही वाचा - २२३ वर्षांमध्ये पहिल्यांदाच नॉत्रे डेम कॅथेड्रल नाही साजरा होणार नाताळ!
ख्रिश्चन बांधवांची मोठी वस्ती म्हणून कुर्ल्यातील ख्रिश्चन गाव प्रसिद्ध असून, येथील प्राचीन होली क्रॉस चर्च सजविण्यात आला आहे. फुलांची सजावट केल्यामुळे मोहक दृश्य पाहायला मिळाले. हजारो ख्रिश्चन बांधवांनी काल (मंगळवारी) मध्यरात्री एकत्र येऊन येशूंचा जन्मोत्सव साजरा केला. पताका आणि क्रिब्स (देखाव्यांनी) लावून गावाची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी पताका, कंदील आणि तोरणांची आरास करण्यात आली होती.
हेही वाचा - क्रीडा जगतातील आजचे सामने, वेळ... वाचा एका क्लिकवर