मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून तपास केला जात असताना आता सीबीआय सुशांतसिंह आणि दिशा सालीयन यांच्या आत्महत्येचे रहस्य शोधण्याचे काम करत आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालीयन यांच्या मृत्यू प्रकरणात क्वाण कंपनीच्या टॅलेंट मॅनेजर जया शाह ही व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जया शाह आणि दिशा सालीयन या दोघींनी एकत्र काम केले होते.
जया आणि दिशा दोघीही क्वाण टॅलेंट कंपनीत एकत्र काम करणार करीत असल्याचे समोर आले होते. जया शाह 2009मध्ये क्वाण कंपनीसोबत जोडली गेली होती, तर 2018 साली दिशा सालीयन हिने क्वाण कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, 2019 साली दिशाने क्वाण ही कंपनी सोडून कॉर्नर स्टोन स्पोर्ट्स अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, ड्रग्स डीलर गौरव आर्या व रिया चक्रवती यांच्यादरम्यान झालेले व्हाट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर या संदर्भात दिल्लीतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, गौरव आर्या यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. लवकरच एनसीबीच्या दिल्लीतील टीमकडून यातील व्यक्तींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहे. यात रिया चक्रवर्तीला या संदर्भात सर्वात आधी चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सीबीआय पथकाच्या कार्यालयाबाहेरुन याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...