ETV Bharat / state

सुशांतच्या वांद्रेस्थित घरी सीबीआयचे पथक दाखल; १४ जूनचे करणार 'रिक्रिएशन' - सीबीआय पथक सुशांत सिंह वांद्रे घर

आज पुन्हा एकदा सुशांतसिंहच्या वांद्र्यातील घरी सीबीआयचे पथक पोहचले आहे. या घरामध्ये सीबीआयच्या पथकासोबत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि सुशांतची बहिण मितू सिंह व सुशांतचा नोकर नीरज यांनासुद्धा नेण्यात आले आहे.

sushant singh
सुशांतसिंह
author img

By

Published : Sep 5, 2020, 11:59 AM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआयकडून सलग 15 दिवस तपास केला जात आहे. आज पुन्हा एकदा सुशांतसिंहच्या वांद्र्यातील घरी सीबीआयचे पथक पोहचले आहे. या घरामध्ये सीबीआयच्या पथकासोबत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि सुशांतची बहिण मितू सिंह व सुशांतचा नोकर नीरज यांनासुद्धा नेण्यात आले आहे. या पथकाकडून पुन्हा एकदा 14 जून रोजी सुशांतच्या घरात घडलेल्या घटनेचे रिक्रिएशन केले जात आहे.

सुशांतच्या वांद्रास्थित घरी सीबीआयचे पथक दाखल

दरम्यान, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतकडे हाऊसकिपिंगचे काम करणारा दीपेश सावंत याला एनसीबीने साक्षीदार बनवले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली नाही. सध्या एनसीबीकडून दीपेश सावंतचा जबाब नोंदवला जात आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स सिंडिकेटचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यानुसार एनसीबीकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना शुक्रवारी एनसीबीने अटक केली. त्यानंतर दीपेश सावंत याला साक्षीदार बनवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.