मुंबई CBI Raid: काही दिवसांपूर्वी अचानक छापेमारी मोहीम सुरू करण्यात आली होती. पहिल्या प्रकरणात, असा आरोप करण्यात आला आहे की, पार्सल विभागाचे कर्मचारी खासगी लोडर कुलींकडून रोख किंवा UPI द्वारे नियमितपणे लाच घेत होते. दुसऱ्या प्रकरणात, मध्य रेल्वेच्या यार्ड विभागात काम करणारे लोकसेवक असलेले कर्मचारी यार्डमध्ये काम करणाऱ्या पॉइंटमॅनच्या खात्यात खासगी एजंटकडून रोख स्वरूपात किंवा यूपीआयद्वारे लाच घेत असल्याचा आरोप आहे. (Mumbai Crime) टर्मिनसवर व्हीपीयू कोचची व्यवस्था करण्यासाठी लाच दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आरोपींनी एजंटकडून लाच घेतली आणि लाचेच्या रकमेतील काही भाग त्यांच्या वरिष्ठांना दिल्याचाही आरोप आहे. आरोपींच्या निवासस्थानासह मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक आदी ठिकाणी सुमारे 8 ठिकाणी झडती घेण्यात आली. या झाडाझडतीत गुन्हेगारी कागदपत्रे, मोबाईल फोन आदी जप्त करण्यात आली आहेत. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे.
छापेमारी करून लाचखोरी पकडली: लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाला बदनाम केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वेतर्फे राबविण्यात येणाऱ्या पार्सल सेवाआडून आपल्या तुंबड्या भरणाऱ्या येथील डझनभर लाचखोर रेल्वे अधिकाऱ्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हे दाखल केले आहेत. सीबीआयने दोन दिवस छापे टाकून पार्सल आणि वजन विभागात होत असलेला घोटाळा उघडकीस आणला आहे. सीबीआयच्या पथकाने सोमवारी आणि मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर अचानक छापेमारी करत पार्सल आणि यार्ड विभागातील अधिकाऱ्यांची लाचखोरी पकडली. यापैकी पहिल्या गुन्ह्यामध्ये सीबीआयने एकूण आठ अधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशातील विविध शहरांत जाणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्यांमध्ये रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान भरले जाते.
ऑनलाईन पद्धतीने घ्यायचे लाच: खासगी कंपन्यांचे लोडर असलेले कुली रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे सामान रेल्वेमध्ये चढवितात. तीन तासांत हे काम पूर्ण करायचे असते. त्यापेक्षा अधिक वेळ लागल्यास वेळेनुसार अतिरिक्त पैसे आकारले जातात. खासगी कंपन्यांनी चढविण्यास अधिक वेळ घेऊनही त्यांच्याकडून दंडवसुली झाली नाही. त्यासाठी संबंधित कंपन्यांकडून अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचं उघड झालं. या प्रकरणी, यार्डचा मुख्याधिकारी प्रणय मुकुंद, यार्ड विभागाचे तीन उपस्टेशन मास्तर गिरधारी लाल सैनी, प्रदीप गौतम, जयंत मौर्या, दोन शंटिग मॅनेजर मिताई लाल यादव, राकेश करांडे, पॉइंटमन मिथिलेश कुमार, रौनित राज या आठ रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत अन्य चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. लोडरच्या जीपेद्वारे लाच घेतली असून खासगी कंपन्यांना अतिरिक्त वेळ देण्यासाठी या रेल्वे अधिकाऱ्यांनी काही वेळा रोखीने लाच घेतली आहे. तर काही प्रकरणात लोडरच्या मोबाइलवरील जी-पेवरून लाच घेतल्याचे सीबीआयच्या छापेमारीत आढळून आले आहे.
हेही वाचा: