ETV Bharat / state

अनिल देशमुखांचा चौकशी अहवाल लीक, वकिलासह सीबीआयच्या उपनिरीक्षकाला अटक

author img

By

Published : Sep 2, 2021, 7:52 AM IST

Updated : Sep 3, 2021, 7:26 PM IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातील अहवाल फोडल्याप्रकरणी त्यांचे जावई आणि वकीलाची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सीबीआयने जावयाला सोडले असून वकिलाला अटक केली आहे. याच प्रकरणात सीबीआयने आपल्या उप निरीक्षक अभिषेक तिवारी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यालाही अटक केली आहे.

CB
CB

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातील अहवाल फोडल्याप्रकरणी त्यांचे जावई आणि वकीलाची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सीबीआयने जावयाला सोडले असून वकिलाला अटक केली आहे. याच प्रकरणात सीबीआयने आपल्या उप निरीक्षक अभिषेक तिवारी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यालाही अटक केली आहे.

सीबीआयने जावयाला सोडले-

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. वरळी सुखदा येथून सीबीआयाने त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयने गौरव चतुर्वेदी यांचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. गरज पडल्यास चतुर्वेदी यांना पुन्हा हजर राहावे लागेल, अशा सूचना देखील सीबीआयने दिल्या आहेत.

प्राथमिक अहवाल लीक-

मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे गाडीतून जात असताना गाडी थांबवली आणि सीबीआयची टीम त्या दोघांना घेऊन गेली होती. काही दिवसांपूर्वी देशमुख प्रकरणातील सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाला होता. याच प्रकरणात सीबीआयने त्यांच्याच पथकातील उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला अटक केल्याीची माहिती मिळत आहे. त्या अधिकाऱ्याचे नाव अभिषेक तिवारी असे असल्याचे समोर आले आहे.

अनिल देशमुख यांना क्लिनचिट, सोशल मीडियावर कागदपत्रे व्हायरल

सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याची माहिती यात देण्यात आली आहे. दरम्यान, या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता सीबीआयकडून मोठी माहिती समोर आली आहे.

सीबीआय अधिकारी शशिधर यांना राष्ट्रपती पदक; अनिल देशमुख प्रकरणाचा केला आहे तपास

केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सहसंचालक मनोज शशिधर यांना स्वतंत्रता दिनानिमित्त विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. शशिधर यांची निर्भिड आणि इमानदार पोलीस अधिकारी अशी ओळख आहे. शशिधर हे गुजरात कॅडरचे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे, शशिधर यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचा तपास केला आहे. शशिधर यांची जानेवारी २०२० साली सीबीआयच्या सहसंचालक पदावर नियुक्ती झाली होती. या नियुक्तीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली होती.

अनिल देशमुखांविरोधात राजकीय दबावातून तपास यंत्रणांचा वापर; नवाब मलिकांचा आरोप

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईसाठी राजकीय दबावातून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वसूली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. देशमुख यांना लूकआऊट नोटीस ईडीने बजावली आहे. मात्र देशमुख चौकशीला हजर राहिले नाही. ईडीकडून वारंवार समन्स पाठवण्यात येत आहेत असा प्रश्न मलिक यांना विचारण्यात आल्यावर देशमुख भारतात आहेत, कुठेही गेलेले नाही असे मलिक म्हणाले. त्यांना कोणतीही लूकआऊट नोटीस बजावलेली नाही. उलट वारंवार समन्स दिले जात आहे. राजकीय दबावातून केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जातोय, असा आरोप मलिक यांनी भाजपचे नाव न घेता केला. या प्रकरणी कायदेशीर लढा देत असून अनिल देशमुख या प्रकरणातून निश्चित बाहेर पडतील, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची पत्नी आरती देशमुख यांना ईडीचे समन्स

देशमुख यांना ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी कार्यलयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र देशमुख यांनी ऑनलाईन पद्धतीने चौकशी करावी. जे काही माहिती कागदपत्रे मागवली जाईल ती दिली जात आहेत, अशी माहिती ईडी कार्यालयास देण्यात येत असल्याचेही त्यांच्या वकिलांकडून सांगितले जात आहे. त्यानंतर ईडीने देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश आणि सून यांनाही समन्स बाजावले होते. यात ते सुद्धा प्रत्यक्ष चौकशीला हजर झाले नाही.

5 मे पासून परमबीर सिंग सुटीवर

परमबीर सिंग यांनी मार्च महिन्यात लेटर बॉम्ब टाकला होता. त्यानंतर ते गृहरक्षक दलाचे संचालक म्हणून काही दिवस कामावर हजर झाले आणि ५ मे रोजी सुटीवर गेले. तेव्हापासून ते आजपर्यंत सिंग कामावर हजर झालेले नाही. गृहविभागाकडून दोन वेळा पत्र पाठवून त्यांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. दरम्यान, परमबीर सिंग सध्या चंदीगड येथे असल्याचे बोलले जात आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या चंदीगडमधील घरालाही कुलूप असल्याचे समजते आहे. त्यामुळे परमबीर सिंग गेले कुठे या चर्चांना उधाण आले आहे.

परमबीर सिंगांच्या आरोपाने खळबळ

उद्योजक मुकेश अंबानींच्या घराजवळ स्कॉर्पिओत स्पोटके आढळल्याच्या प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंग यांनी शंभर कोटी वसुली प्रकरणाचा 'लेटर बॉम्ब' टाकत देशमुखांवर आरोप केले होते. या 'लेटर बाँम्ब'ने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली होती. यावरून विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले होते.

Last Updated : Sep 3, 2021, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.