मुंबई : वरळी परिसरात राहणारे वरुण पवनकुमार गर्ग हे ऍपग्रॅड एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. या कंपनीचे वरळी परिसरात मुख्य कार्यालय आहे. या कंपनीत 7 हजार 700 अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीकडून संपूर्ण भारतात ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम चालते. त्यांची कंपनी आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण देणारी संस्था आहे. कंपनीसोबत जगातील काही नामांकित विद्यापीठांचा करार झाला आहे.
ऑनलाईनसाठी नियुक्ती : या कंपनीत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना त्याच्या ऑनलाईन शिक्षणासाठी कंपनीकडून शिक्षकाची नियुक्ती केली जाते. त्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीने ऍकडमीक असोशिएट टिमवर असते. ही टिम शिक्षकांची नियुक्ती करणे, त्यांना त्यांचे पेमेंट करणे आदी सर्व काम करते. या टिममध्ये केशव अग्रवाल, ओजस गुप्तासह इतर अधिकार्यांचा समावेश होता. काही महिन्यांपूर्वी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांना केशव, ओजस यांनी बोगस बिल सादर करुन कंपनीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. दोन आरोपींनी ऑनलाईन शिक्षण देणार्या काही शिक्षकांच्या नावे बोगस पेमेंट केल्याचे त्याचप्रमाणे संबंधित शिक्षकांना 12 कोटी 76 लाख 10 हजार 430 रुपयांचे पेमेंट झाल्याचे दिसून आले.
कोट्यवधींचा घोटाळा : कंपनीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर वरुण गर्ग यांचनी वरळी पोलिसांत संबंधित आरोपिंविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर केशव अग्रवाल, ओजन गुप्ता यांच्यासह इतर आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून कंपनीच्या 12 कोटी 76 लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक केली. त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर या गुन्ह्याचा तपास वरळी पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
यापूर्वीची घटना : मुंबईतील एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोतया सेल्स टॅक्स अधिकारी बनून आलेल्या बंटी-बबलीने ३२ लाख रुपयांना गंडा घातला होता. या प्रकरणी एल टी पोलिसांनी महिलेसह एका पुरुष आरोपीला अवघ्या ७ तासात अटक केली होती. संजयसिंग अजमेरसिंग करचोली (वय ३३ वर्षे) आणि रजिया अजीज शेख (वय ३६ वर्षे) अशी अटक आरोपींची नावे होती. या आरोपींना न्यायालयात हजर केले होते, तेव्हा त्यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.