मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) हस्तकाविरोधातील खटल्यात बुधवारी सकाळी एका साक्षीदाराने सत्र न्यायालयात हजेरी लावली. या साक्षीदाराने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यात दिलेली साक्ष (testimony given in Mumbai blasts case) या खटल्यातही ग्राह्य धरण्यात यावी. असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. सरकारी वकिलांची यासंदर्भातील विनंती मान्य करीत न्यायालयाने सुनावणी 31 ऑक्टोबरपर्यंत तहकूब (sessions court accepted plea) केली. सरकारी पक्ष या प्रकरणात एकूण 10 साक्षीदारांची साक्ष तपासणार आहे.
इब्राहिम पारकरची हत्या : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरची हत्या डॉन अरुण गवळीच्या व्यक्तींनी केली होती. त्यांची जे. जे. रुग्णालयात दाऊद इब्राहिमच्या हस्तकांनी गोळी हत्या केली होती. डॉन अरुण गवळीच्या व्यक्तींना जे. जे. रुग्णालयात दाऊद इब्राहिमच्या हस्तकांनी मारल्यानंतर मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देश हा हादरून गेला होता. या प्रकरणातील दाऊद इब्राहिमचे हस्तक यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात 20 वर्षानंतर 19 ऑक्टोंबर बुधवार रोजी ट्रायल कोर्टात खटला सुरू झाला. आता या प्रकरणात 31 ऑक्टोबर रोजी जबाब नोंदवण्यात येणार आहे.
साक्षीदारांना हजर करण्यास मुभा : मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये 1992 मध्ये अरुण गवळीचे हस्तगत यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील व्यक्तींकडून ठार मारण्यात आले होते. आरोपी यासीन मन्सूर मोहम्मद फारुख ऊर्फ फारुख टकला याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात हा खटला चालणार आहे. त्याच्यावर आरोप निश्चिती करण्यात आली असून न्यायालयाने 19 ऑक्टोबरपासून सरकारी पक्षाला साक्षीदारांना हजर करण्यास मुभा दिली होते.
फारुख टकलाला अटक : दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकरची अरुण गवळी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून दाऊद टोळीच्या शार्पशूटर्सनी 22 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये अंदाधुंद गोळीबार करून दहशतीचे थैमान माजवले होते. या प्रकरणात दाऊदचा जवळचा साथीदार फारुख टकला याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात बंदिस्त (Bombay Session Court) आहे.
20 वर्षानंतर आरोप निश्चिती : शूटआऊट घडून 20 वर्षे उलटल्यानंतर त्याच्याविरोधात आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. न्यायाधीशांनी 19 ऑक्टोबरपासून साक्षीदारांची साक्ष तपासण्यास सरकारी पक्षाला परवानगी दिली आहे. या प्रकरणात एकूण 77 साक्षीदार असून फारुख टकलाविरुद्ध सरकार पक्षाकडून 10 साक्षीदार हजर केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. करण जैन, तर सरकारी पक्षातर्फे अॅड. घोन्साल्विस युक्तिवाद करणार आहेत. शूटआऊट प्रकरणातील इतर सर्व आरोपी यापूर्वीच दोषी ठरले असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.
खटल्याची सुनावणी सुरू : दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकरची अरुण गवळी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून दाऊद टोळीच्या शॉपशूटर्सनी 22 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये अंदाधुंद गोळीबार करून दहशतीचे थैमान माजवले होते. या प्रकरणात दाऊदचा जवळचा साथीदार फारुख टकला याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात बंदिस्त आहे. शूटआऊट घडून वीस वर्षे उलटल्यानंतर त्याच्याविरोधात आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे.