मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा जात असताना वाद्रे येथे चालकाने आपली कार ताफ्यात घुसवली होती. या प्रकरणी अटक होऊन जामिन मिळालेल्या आरोपीचे नाव गंगू रझाक असे आहे.
ताफ्यात घुसली कार: मुख्यमंत्र्यांचा ताफा गुरुवारी वांद्रे-वरळी सी-लिंकवरून जात होता. सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढे आणि मागे कार असतात. तरीदेखील अचानक निळ्या रंगाची आलिशान कार लाईन सोडून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात घुसली. पोलिसांनी त्या कार चालकाला थांबण्याचा इशारा केला. परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. चालक वेगाने गाडी चालवत राहिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जबरदस्तीने त्याची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्या कार पढे आपली गाडी नेली. त्याच्या कार समोर आडवी कार उभी केली. त्यानंतर रझाक याने गाडी थांबवली. त्यानंतर त्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली.
अटक आणि जामीन: वांद्रे पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात नियम तोडून कार घुसवल्यामुळे पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 188, 279 आणि 336 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्यानुसार, गंगू रझाक हा वांद्रे उपनगरात राहतो. त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या दाव्यानुसार त्याला गुन्ह्याची कल्पना नव्हती. तसेच त्याचा कोणताही हेतू देखील नव्हता. परिणामी मुंबई न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. पोलिसांनी रझाकला न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याला त्याच्या कृत्याची विचारणा केली.
मला महत्वाच्या कामावर जायचे होते. प्रचंड उशीर झाला होता. म्हणून घाईत लक्षात आले नाही की, अशी कृती केल्यावर तो गुन्हा ठरतो. तसेच फौजदारी गुन्हा दाखल होऊन अटकदेखील होऊ शकते, हे लक्षात आले नाही- गंगू रझाक
हेही वाचा-