मुंबई - केरळमधील कोझिकोड येथील विमानतळावर धावपट्टीवरुन विमान घसरून शुक्रवारी मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत मराठमोळे कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला. साठे हे मुंबईचे रहिवासी होते. त्यांचे पार्थिव रविवारी मुंबईत आणण्यात आले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.
त्यांचे पार्थिव वांद्रेतील भाभा रूग्णालयात ठेवण्यात आले होते. ते पार्थिव चांदिवली येथील नाहर या निवासस्थानी आणण्यात आल्या होते.
- कॅप्टन दीपक साठे अनंतात विलीन
- कॅप्टन दीपक साठे यांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव विक्रोळी येथील स्मशानभूमीच्या दिशेने निघाले आहे.
- महापौर किशोरी पेडणेकर या कॅप्टन दीपक साठे यांच्या पवई येथील निवासस्थानी अंतिम दर्शन घेण्यासाठी दाखल
- शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विंग कमांडर कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांनी आपल्या अतुलनीय कामगिरीने पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी इतिहास रचला आहे. त्यांना मानाचा मुजरा आणि स्मृतींना विनम्र श्रद्धांजली.