ETV Bharat / state

हैदराबाद बलात्कार प्रकरण : राज्यात अनेक ठिकाणी 'कँडल मार्च' - हैदराबाद बलात्कार प्रकरण

हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला.

राज्यात अनेक ठिकाणी 'कँडल मार्च'
राज्यात अनेक ठिकाणी 'कँडल मार्च'
author img

By

Published : Dec 4, 2019, 10:00 AM IST

मुंबई - हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. मुंबईच्या चेंबूर - ट्रॉम्बे परिसरातील विविध संघटनानी एकत्र येत या प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे.

सातारा - जिल्ह्यातील कराडमधील विद्यानगर परिसरातही महिला आणि युवतींनी कँडल मार्च काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. आरोपींना फाशी देऊन पीडितेला न्याय देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. विद्यानगरमधील कृष्णा कॅनॉल ते बनवडी दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला.

नंदुरबार - तळोदा येथे काँग्रेस कमिटीच्यावतीने कँडल मार्च काढण्यात आला. रोपींवर खटला चालवण्याऐवजी त्यांना भर चौकात फाशी देणयाची मागणी यावेळी करण्यात आली. याचसोबत महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित करून देशातील कायदे व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली गेली.

कोल्हापूर - या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. भारतात अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी कडक कायदा नाही, याचे खूप वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया यात सहभागी झालेल्या काही विद्यार्थिनींनी दिली. तर, लवकरात लवकर कडक कायदा काढून नराधमांना शिक्षा द्यावी, अशी मागणीही काही विद्यार्थ्यांनी यावेळी केली.

राज्यात अनेक ठिकाणी 'कँडल मार्च'

पुणे - क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मभूमीत महाविद्यालयीन आणि शालेय तरुण-तरुणींनी एकत्र येत कँडल मार्च काढला. मुलींवर होणारे अत्याचार कधी थांबणार? असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. यासोबतच हैदराबाद प्रकरणाचा निषेध यावेळी केला गेला.

Intro:डॉ. प्रियांका रेड्डी प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशीची चेंबूर - ट्रॉम्बे परिसरातील विविध संघटनेची मागणी

हैदराबाद राज्यातील प्रियंका रेड्डी या पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर नुकताच झालेल्या सामूहिक बलात्कार नंतर आरोपीने त्या महिलेलं जिवंत जाळून खून केल्याप्रकरणाचे पडसाद देशभर उमटले असून या घटनेचा निषेध मुंबईतील चेंबूर- ट्रोम्बे परिसरातील विविध संघटनानी आज सायंकाळी चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ करत नराधमांना फाशीच्या शिक्षेची तात्काळ मागणी करण्यात आलीBody:डॉ. प्रियांका रेड्डी प्रकरणातील नराधमांना तात्काळ फाशीची चेंबूर - ट्रॉम्बे परिसरातील विविध संघटनेची मागणी

हैदराबाद राज्यातील प्रियंका रेड्डी या पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर नुकताच झालेल्या सामूहिक बलात्कार नंतर आरोपीने त्या महिलेलं जिवंत जाळून खून केल्याप्रकरणाचे पडसाद देशभर उमटले असून या घटनेचा निषेध मुंबईतील चेंबूर- ट्रोम्बे परिसरातील विविध संघटनानी आज सायंकाळी चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ करत नराधमांना फाशीच्या शिक्षेची तात्काळ मागणी करण्यात आली

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिला व मुलीच्या सुरक्षा करिता पोक्सो कायदा करण्यात आला तरीही देशात रोज अत्याचार,बलात्कार घटनांचे प्रमाण वाढत असून आरोपींना कायद्यांची भीती वाटत नसल्याची या कायद्याची अंमलबजावणी किती प्रभावीरित्या करण्यात येत आहे असा प्रश्न निषेध व्यक्त करताना महिला संघटनांनी उपस्थित केला आहे.देशाच्या कोणत्याही भागात अशाप्रकारच्या घटना जेंव्हा घडतात तेव्हा सरकार महिला सुरक्षा करीता नवीन कायद्या बनविते परंतु त्याची अंमलबजावणी करीत नाही. उलट महिलांच्या अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठविणाऱ्या संघटनांवर कारवाई केली जाते. अशी शोकांतिका उपस्थित महिलांनी यावेळी मांडली.
शासनाने कडक कायदा करून या नराधम आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी तसेंच त्याना फाशी देण्यात यावी या मागणी करिता एकत्र आलेल्या विविध संघटनांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच मेणबत्ती लावून डॉ. प्रियंका रेड्डी हिला श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी मुमताज शेख, सुजाता लवांडे,  चेंबूर व ट्रोम्बे विभागातील विविध संघटनेच्या महिला लहान मुलीनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
Byt : मुमताज शेख सामाजिक कार्यकर्त्या चेंबूरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.