ETV Bharat / state

अवकाळी पावसासाठी आढावा बैठक; मात्र, शिवसेनेच्या 'या' मंत्र्यांची दांडी - ministers meeting at varsha

शिवसेना-भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या संघर्षासाठी एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105, तर शिवसेनेला 56 जागांवर विजय मिळाला आहे. महायुतीला स्पष्ट कौल मिळाल्यानंतरही युतीचे सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपच्या युतीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांच्या अनुपस्थितीचे कारण देखील हेच मानले जात आहे.

अवकाळी पावसासाठी आढावा बैठक; मात्र, शिवसेनेच्या 'या' मंत्र्यांची दांडी
author img

By

Published : Nov 2, 2019, 1:47 PM IST

मुंबई - राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक वर्षा बंगल्यावर होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ उपसमितीमधील इतर मंत्री आणि सचिव देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या बैठकीला पाठ फिरवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे. बैठकीला भाजपचे चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अनिल बोंडे, सुभाष देशमुख, सुरेश खाडे यांच्यासोबत शिवसेनेचे माजी जलसंवर्धन राज्यमंत्री विजय शिवतारे आदी या बैठकीला उपस्थित आहेत. तसेच मित्र पक्षाचे नेते रामदास आठवले, महादेव जानकर, अविनाश महातेकर हे देखील उपस्थित आहेत. तर मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये समावेश नसताना देखील महादेव जानकर रामदास आठवले उपस्थित असल्याने इतर राजकीय मुद्द्यांवर देखील अनोपचारिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - राजकारण्यांना सदबुद्धी येऊन लवकर सरकार स्थापन व्हावे- अमृता फडणवीस

फ्लॅश

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी ची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक थोड्याच वेळात मुख्यमंत्री निवासस्थान येथे होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ उपसमिती मधील इतर मंत्री आणि सचिव देखील होणार उपस्थित

मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला चंद्रकांत पाटील ,गिरीश महाजन ,अनिल बोंडे ,सुभाष देशमुख सुरेश खाडे उपस्थित थोड्याच वेळात होणार बैठक सुरू
 रामदास आठवले महादेव जानकर अविनाश महातेकर हेदेखील उपस्थित
मंत्रिमंडळ उपसमिती समावेश नसतानादेखील महादेव जानकर रामदास आठवले उपस्थित असल्याने इतर राजकीय मुद्द्यावर देखील अनोपचारिक चर्चा होण्याची शक्यता
विजय शिवतारे बैठकीला उपस्थित
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.