Cabinet Decisions : आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये खालील प्रमुख निर्णयांचा समावेश होता. याबाबतची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षानं दिली आहे.
मदत व पुनर्वसन तसंच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण केलं. प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत तसंच ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश महसूल व वन विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याच्या एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचं मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं.
*राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय*
* अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार -
( मदत व पुनर्वसन)
* झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा
( गृहनिर्माण विभाग )
* राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा
( शालेय शिक्षण)
* मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार
( मराठी भाषा विभाग)
* मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली
( अल्पसंख्याक विभाग )
* औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन
( उद्योग विभाग )
* महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार
( महसूल विभाग)
* शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा
( महसूल विभाग)