मुंबई - राज्यातील महापालिकांच्या नामनिर्देशित सदस्य संख्येत ( Cabinet Decision For Nominated Members ) दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार राज्यातील महापालिकांमध्ये सदस्य संख्येत ( Nominated Members Of BMC ) वाढ होणार आहे. मुंबई मनपात तब्बल 28 नामनिर्देशित नगरसेवक ( Now 28 Corporator Will Be In Mumbai Corporation ) वाढणार आहेत. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांच्या चांगल्याच आशा पल्लवीत होणार आहेत.
पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपने 2014 मध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने अमलात आणली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेत ( MVA Government ) येताच, पुन्हा एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला. आता अडीच वर्षात सत्तांतर होताच, शिंदे - फडणवीस सरकारने पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या नुसार मुंबई महानगरपालिका अधनियमाच्या कलम 5(1)(ब) मध्ये दहा नामनिर्देशित सदस्य व महाराष्ट्र महानगरपालिका ( Cabinet Decision For Nominated Members Of BMC ) अधिनियमाच्या कलम 5(2)(ब) मध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाहीत किंवा दहा पालिका सदस्य, यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा तत्वत: निर्णय घेतला आहे. महाधिवक्त्या कडूनही यासाठी अभिप्राय मागवण्यात आला.
नामनिर्देशित सदस्यांची गुणात्मक वाढ होणार नामनिर्देशित सदस्यांची गुणात्मक वाढ होणार मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मधील कलम 5(1)(ब) व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 मधील कलम 5(2)(ब) मध्ये नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांचे प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या महानगरपालिका नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांची संख्या पाच आहे. राज्यात शहरी प्रशासनास सहकार्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. अशाप्रकारे नियुक्त केलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या ज्ञानाचा वापर करून महानगर पालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ केली जाणार आहे.
मुंबई मनपात 28 नामनिर्देशित नगरसेवक मुंबई मनपात सुमारे 28 नामनिर्देशित नगरसेवक कायद्यातील तरतुदीनुसार 20 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरासाठी नगरसेवकांची संख्या ठरवून दिली आहे. कमाल 22 लाख लोकसंख्येपर्यंत ही कमाल मर्यादा आहे. मात्र शहरातील रहिवाशांची संख्या ही 22 लाखांपेक्षा निश्चितच अधिक होणार असल्यामुळे 22 लाखांपेक्षा पुढील प्रत्येकी 50 हजार लोकसंख्येमागे 1 या प्रमाणे नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. मुंबई महापालिकेत 288 नगरसेवकांच्या संख्येनुसार दहा टक्के वाढ धरल्यास सुमारे 28 नगरसेवक वाढणार आहेत.
लवकरच महापालिकांच्या निवडणुका मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, मालेगाव या महापालिकांची निवडणूक तोंडावर आली आहे. इचलकरंजी महापालिका निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची पहिलीच निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई मनपातील सत्तेला सुरुंग लावण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासाठी भाजपने सोबत घेतले आहे. दुसरीकडे शिवसेनेत पडलेल्या फुटीचा भाजपला मोठा फायदा होणार आहे.