ETV Bharat / state

सीएएला घाबरण्याची काहीही गरज नाही, मुख्यमंत्री ठाकरेंचे मोदी भेटीनंतर स्पष्टीकरण

सीएए, एनपीआर, एनआरसी, जीएसटी, शेतकऱयांच्या अडचणी या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. तसेच महाराष्ट्रातल्या इतरही प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

cm
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Feb 21, 2020, 7:20 PM IST

नवी दिल्ली - 'सीएए' हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. या कायद्याला घाबरण्याची काहीही गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली येथे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. पंतप्रधानांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, सीएए, एनपीआर, एनआरसी, जीएसटी, शेतकऱ्यांच्या अडचणी या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. तसेच महाराष्ट्रातल्या इतरही प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कोणताही वाद नाही असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यपाल आणि सरकार यामध्ये वादाची ठिणगी आहे असे बोलणे हे चुकीचे आहे. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर आमचे सरकार काम करत असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -

मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या निवासस्थानी दाखल..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.